काश्मीर मुद्द्यावर पुन्हा बरळला आफ्रिदी, एका ट्वीटने गंभीरनं केली बोलती बंद!

काश्मीर मुद्द्यावर पुन्हा बरळला आफ्रिदी, एका ट्वीटने गंभीरनं केली बोलती बंद!

भाजपचे खासदार आणि भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदी पुन्हा एकदा भिडले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : भाजपचे खासदार आणि भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदी पुन्हा एकदा भिडले आहेत. कलम 370 रद्द झाल्यानंतर अफ्रिदीनं काश्मीर मुद्द्यावर वादग्रस्त विधान करण्यास सुरुवात केली. त्यामुळं याआधी गौतम गंभीरनं फैलावर घेतल्यानंतर आता पुन्हा या दोघांमध्ये ट्विटर वॉर रंगले आहे.

अफ्रिदीनं बॉर्डरवर जात काश्मीरमधल्या नागरिकांसाठी काम करणार असल्याचे ट्वीट केले होते. यावर गंभीरनं अफ्रिदीवर पलटवार करत, लहान मुलांची पुस्तक तुझ्यासाठी मागवू का, असा मजेशीर सवाल केला. गंभीरनं, “मित्रांनो, या फोटोमध्ये शाहिद आफ्रिदी स्वत: आफ्रिदीला विचारत आहे की, आफ्रिदीला लाज वाटेल असे काम आफ्रिदीला का करायचे आहे. आफ्रिदीनं परिपक्व होण्यासाठी आता कायमचा नकार दिला आहे की काय असं वाटत आहे. त्यामुळं आता आफ्रिदीसाठी ऑनलाईन किंडरगार्डनची पुस्तके मागवणार आहे”, असे मिश्किल ट्वीट केले.

या कारणामुळं आफ्रिदीवर भडकला गंभीर

बुधवारी आफ्रिदीनं काश्मीर मुद्द्यावर एक वादग्रस्त ट्वीट केले. आफ्रिदीनं पाकिस्तानी जनतेला, "पंतप्रधान इमरान यांनी सुरू केलेल्या ‘काश्मीर तास’ या कार्यक्रमाशी जोडले जाण्याची विनंती केली होती. आफ्रिदीनं याबाबत आपण पीओके आणि बॉर्डरवर उपस्थित राहणार आहे", असे ट्वीट केले. या ट्वीटवर गौतम गंभीरनं आफ्रिदीची शाळा घेतली.

वाचा-काश्मीरमध्ये हिंसाचार घडवण्याचा पाकचा कट, 300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत?

जावेद मियांदादची मुक्ताफळे

पाकिस्तानी चॅनलनं काश्मीर मुद्द्यावर प्रश्न विचारले असता, “तुमच्याकडे जर सामग्री आहे तर, तुम्ही हल्ला केला पाहिजे. प्रत्येकवेळी नियम तुमच्या मदतीला येणार नाही. जेव्हा त्यांचे शव घरी जातील, तेव्हा त्यांना अक्कल येईल”, अशी मुक्ताफळे उधळली. तसेच, जेव्हा मियादांद यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय सल्ला देणार असे विचारले असता, “मी आधीही सांगितले आहे, भारत एक भित्रा देश आहे. त्यांनी आतापर्यंत केले काय आहे. अणुअस्त्र आम्ही असेच नाही ठेवले आहेत. एक संधी आणि भारत पूर्ण साफ करून देईल”, असे भडकाऊ विधान केले होते.

वाचा-मोदी सरकारला झटका, कलम 370 रद्द केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं बजावली नोटीस

पाकिस्तान खेळाडूंचे वादग्रस्त विधान

जावेद मियादांद यांच्या आधी पाकचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं संयुक्त राष्ट्रसंघाने या प्रकरणी लक्ष घालावं असं म्हटलं होतं. त्यानंतर पाकिस्तानी संघाचा कर्णधार सर्फराज अहमदनेही प्रतिक्रिया दिली होती. ईद साजरी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सर्फराज म्हणाला की, मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की या कठीण काळात आमच्या काश्मीरी बांधवांची मदत कर. तर, रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरनंही यावरून ट्वीट केलं आहे. त्यानं दुखापत झालेल्या लहान मुलाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यानं म्हटंल आहे की, बलिदानाचा अर्थ तुम्ही सांगितलात, तुमच्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही तुमच्या सोबत आहोत असं म्हणत त्यानं ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा-इम्रान खान अणुयुद्धाची धमकी देत होते तेव्हा PM मोदी होते पाकच्या हवाई हद्दीत!

बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल

First published: August 28, 2019, 9:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading