‘काश्मीरवर बोलणाऱ्या आफ्रिदीचं फक्त वय वाढलं, अक्कल नाही’, गंभीरच्या टीकेने वस्त्रहरण!

‘काश्मीरवर बोलणाऱ्या आफ्रिदीचं फक्त वय वाढलं, अक्कल नाही’, गंभीरच्या टीकेने वस्त्रहरण!

काश्मीर मुद्द्यावर पुन्हा बरळला आफ्रिदी, गंभीरनं पुन्हा एकदा केली बोलती बंद.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द झाल्यानंतर पाकिस्तानची हवा निघाली आहे. त्यामुळं आपलं मत मांडण्यासाठी पाकिस्तानी खेळाडू आणि राजकारणी वादग्रस्त विधान करत आहे. बुधवारी (28 ऑगस्ट) पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीनं बॉर्डर आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये दौरा करणार असल्याचे ट्वीट करून जाहीर केले. त्यानंतर भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं आफ्रिदीची शाळा घेतली.

दरम्यान, गुरुवाती एएनआयशी बोलताना गंभीरनं आफ्रिदीला अक्कलचं नसल्याचे सांगितले. तसेच, “काही लोकांचे डोके हे त्यांच्या वयानुसार वाढते. मात्र आफ्रिदीबाबत तसं घडलं नाही”, अशा शब्दात त्याच्यावर टीका केली. दरम्यान गंभीर आणि आफ्रिदी यांच्यात मैदानावर आणि बाहेरही वाद होत होते. त्यामुळं सुरुवातीला गंभीरनं आफ्रिदीवर काय बोलणार असेही मत व्यक्त केले.

आफ्रिदीवर गंभीरचा पलटवार

गंभीरनं आफ्रिदीवरला राजकारणात रस असेल तर राजकारणात यावे असे सांगत “मला असे वाटते त्याच्या बाबत बोलण्यात काही रस नाही. काही लोक असतात जे कधीच मोठे होत नाही. तर काही लोकांचे फक्त वय वाढते, अक्कल तेवढीच असते. क्रिकेट खेळताना त्यांचे जे वय होते, तेवढेच आताही आहे”, अशी टीका केली. तसेच, सगळ्या गोष्टींवर मत नोंदवण्याची इच्छा असेल तर, राजकारणात यावे मग बघू, असेही आवाहन केले.

वाचा-फक्त एक विजय आणि कोहली मोडणार धोनीचा सर्वात मोठा विक्रम!

आफ्रिदीला लहान मुलांच्या पुस्तकांची गरज

दरम्यान, अफ्रिदीनं बॉर्डरवर जात काश्मीरमधल्या नागरिकांसाठी काम करणार असल्याचे ट्वीट केले होते. यावर गंभीरनं अफ्रिदीवर पलटवार करत, लहान मुलांची पुस्तक तुझ्यासाठी मागवू का, असा मजेशीर सवाल केला. गंभीरनं, “मित्रांनो, या फोटोमध्ये शाहिद आफ्रिदी स्वत: आफ्रिदीला विचारत आहे की, आफ्रिदीला लाज वाटेल असे काम आफ्रिदीला का करायचे आहे. आफ्रिदीनं परिपक्व होण्यासाठी आता कायमचा नकार दिला आहे की काय असं वाटत आहे. त्यामुळं आता आफ्रिदीसाठी ऑनलाईन किंडरगार्डनची पुस्तके मागवणार आहे”, असे मिश्किल ट्वीट केले.

वाचा-वडिलांनी जिंकून दिले कारगिल युध्द, मुलगा धोनी स्टाईलनं क्रिकेट कप जिंकण्यास सज्ज

या कारणामुळं आफ्रिदीवर भडकला गंभीर

बुधवारी आफ्रिदीनं काश्मीर मुद्द्यावर एक वादग्रस्त ट्वीट केले. आफ्रिदीनं पाकिस्तानी जनतेला, "पंतप्रधान इमरान यांनी सुरू केलेल्या ‘काश्मीर तास’ या कार्यक्रमाशी जोडले जाण्याची विनंती केली होती. आफ्रिदीनं याबाबत आपण पीओके आणि बॉर्डरवर उपस्थित राहणार आहे", असे ट्वीट केले. या ट्वीटवर गौतम गंभीरनं आफ्रिदीची शाळा घेतली.

जावेद मियांदादची मुक्ताफळे

पाकिस्तानी चॅनलनं काश्मीर मुद्द्यावर प्रश्न विचारले असता, “तुमच्याकडे जर सामग्री आहे तर, तुम्ही हल्ला केला पाहिजे. प्रत्येकवेळी नियम तुमच्या मदतीला येणार नाही. जेव्हा त्यांचे शव घरी जातील, तेव्हा त्यांना अक्कल येईल”, अशी मुक्ताफळे उधळली. तसेच, जेव्हा मियादांद यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय सल्ला देणार असे विचारले असता, “मी आधीही सांगितले आहे, भारत एक भित्रा देश आहे. त्यांनी आतापर्यंत केले काय आहे. अणुअस्त्र आम्ही असेच नाही ठेवले आहेत. एक संधी आणि भारत पूर्ण साफ करून देईल”, असे भडकाऊ विधान केले होते.

पाकिस्तान खेळाडूंचे वादग्रस्त विधान

जावेद मियादांद यांच्या आधी पाकचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं संयुक्त राष्ट्रसंघाने या प्रकरणी लक्ष घालावं असं म्हटलं होतं. त्यानंतर पाकिस्तानी संघाचा कर्णधार सर्फराज अहमदनेही प्रतिक्रिया दिली होती. ईद साजरी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सर्फराज म्हणाला की, मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की या कठीण काळात आमच्या काश्मीरी बांधवांची मदत कर. तर, रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरनंही यावरून ट्वीट केलं आहे. त्यानं दुखापत झालेल्या लहान मुलाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यानं म्हटंल आहे की, बलिदानाचा अर्थ तुम्ही सांगितलात, तुमच्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना करतो. आम्ही तुमच्या सोबत आहोत असं म्हणत त्यानं ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वाचा-काश्मीर मुद्द्यावर पुन्हा बरळला आफ्रिदी, एका ट्वीटने गंभीरनं केली बोलती बंद!

टोल नाक्यावर महिला कर्मचाऱ्याला मारहाण, संतापजनक VIDEO व्हायरल

Published by: Akshay Shitole
First published: August 29, 2019, 5:26 PM IST

ताज्या बातम्या