गंभीरला अक्कल नाही, तरी लोकांनी मतं दिली ; आफ्रिदी पुन्हा बरळला

गंभीरला अक्कल नाही, तरी लोकांनी मतं दिली ; आफ्रिदी पुन्हा बरळला

गंभीरच्या विजयानंतर त्याचा क्रिकेटच्या मैदानावरील कट्टर विरोधक शाहिद आफ्रिदी यानं त्याचं कौतुक करण्याऐवजी त्यावर टीका केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 मे : भारतीय संघाला 2011 साली विश्वचषक जिंकून देणारा धडाकेबाज फलंदाज गौतम गंभीर राजकारणाच्या मैदानात उतरला. आणि त्यानं थेट लोकसभा निवडणुक जिंकत, खासदार बनत संसदेत प्रवेश केला आहे. भाजपकडूव लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या गंभीरनं आपच्या उमेदवाराला धुळ चारली. मात्र गंभीरच्या विजयानंतर त्याचा क्रिकेटच्या मैदानावरील कट्टर विरोधक शाहिद आफ्रिदी यानं त्याचं कौतुक करण्याऐवजी त्यावर टीका केली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर गंभीरनं थेट मत व्यक्त केले होते की भारत आणि पाकिस्तान यांच्यात यापुढे एकही क्रिकेट सामना झाला नाही पाहिजे. मात्र गंभीरच्या या मतावर त्याचा कट्टर विरोधक आफ्रिदीनं, ''जो व्यक्ती समजूतदार असतो, तो असं वक्तव्य करत नाही. ज्याला अक्कल नाही त्याला लोकांनी मत दिलं आहे'',असे वक्तव्य केले. शाहिदी आफ्रिदीनं पाकिस्तानमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत गंभीरवर टीका केली. दरम्यान भाजकडून निवडणुकाला उभा राहिलेल्या गंभीरला 6 लाख 96 हजार 156 मत मिळाली होती.

गौतम आणि आफ्रिदी यांचे नाते नेहमीच गंभीर

आफ्रिदीनं आपले आत्मचरित्र गेम चेंजर यात गंभीरवर भयंकर आरोप केले होते. आफ्रिदीनं,''गंभीर एकदमच विचित्र आहे. गंभीर आणि त्याचा अहंकार काय बोलणार याबद्दल. गंभीरकडे व्यक्तीमत्वच नाही. क्रिकेटसारखा महान खेळ खेळणाऱ्या गंभीरकडे व्यक्तीमत्वच नाही आहे. त्याच्या नावावर विक्रमही नाहीत तर केवळ अहंकार आहे'', अशा शब्दात टीका केली होती. मात्र त्याच्या या टीकेला गंभीरने सडेतोड उत्तर दिले आहे. गंभीरनं ट्विट करत, आफ्रिदी, तू केलेली टीका ही खूपच हास्यास्पद आहे. असे असले तरी, आम्ही अजूनही पाकिस्तानी नागरीकांना वैद्यकीय उपचारांसाठी लागणारा व्हिसा मंजूर करणे बंद केलेले नाही. त्यामुळं तु भारतात या मी स्वतः तुला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाईन, आफ्रिदीची थट्टा केली.

वयाबाबतही केला आफ्रिदीनं खोटा दावा

आफ्रिदीनं आपल्या पुस्तकात आपल्या वयाबाबतही खुलासा केला आहे. यामुळं आफ्रिदीचा खोटारडेपणा उघड झाला आहे. त्यानं पुस्तकात माझा जन्म १९८० सालचा नव्हे, तर १९७५ चा आहे, असे स्पष्ट केले आहे. श्रीलंकेविरोधात १९९६ मध्ये मी ३७ चेंडूत शतक झळकावलं, तेव्हा मी १६ नव्हे १९ वर्षांचा होता, अस स्पष्टीकरण शाहिदनं आपल्या आत्मचरित्रातून दिलं आहे. सध्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावणाऱ्या वीरांच्या यादीत आफ्रिदी अव्वल क्रमांकावर आहे. मात्र आता त्याच्या नावावरचा हा विक्रम काढला जाऊ शकतो.

VIDEO: MIMचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील का भडकले?

First published: May 27, 2019, 1:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading