पाकला कठोर शब्दांत ठणकावणारा गंभीर 6 वर्षीय मुलीसाठी झाला बजरंगी भाईजान!

पाकला कठोर शब्दांत ठणकावणारा गंभीर 6 वर्षीय मुलीसाठी झाला बजरंगी भाईजान!

दहशतवादाचं समर्थन केलं जातं यावरून भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने पाकिस्तानला अनेकदा ठणकावलं आहे. आता त्याने पाकिस्तानमधील 6 वर्षीय मुलीला मदत केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : भारत पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने एका पाकिस्तानी मुलीसाठी केलेल्या कामाची चर्चा होत आहे. त्याने पाकिस्तानमधील सहा वर्षीय मुलीच्या व्हीसासाठी मदत केली आहे. गौतम गंभीरने सहा वर्षीय ओमैमा अलीला मदत केली. ओमैमाला हृदयाचा आजार असून तिच्यावर भारतात उपचार करायचे आहेत. त्यासाठी व्हीसा मिळण्यासाठी गंभीर मदत करणार आहे.

दोन्ही देशांतील संबंध कितीही तणावाचे असले तर याचा पाकिस्तानातील सामन्या नागरिकांना फटका बसू नये ज्यांना उपचारांची गरज आहे. याआधी दिवंगत माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही अशा प्रकारची मदत केली आहे. आता गंभीरने मुलीच्या मदतीसाठी सध्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर प्रसाद यांना पत्र लिहिलं आहे. मुलीला तिचे आई वडिल सर्जरीसाठी भारतात आणणार होते. त्यासाठी व्हीसाची गरज होती.

गंभीरने लिहलेल्या पत्राला उत्तर देताना यावर लवकर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असं परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सांगितलं. तसेच इस्लामाबादमधील भारतीय दूतावासाला संबंधित मुलीला आणि तिच्या आई-वडिलांना व्हीसा द्यावा असे आदेश दिले आहेत. ही कार्यवाही झाल्यानंतर गंभीरने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.

आतापर्यंत गंभीरने पाकिस्तानच्या कुरापतीनंतर अनेकवेळा कठोर शब्दांत सुनावले आहे. गंभीरने म्हटलं की, त्याला फक्त पाकिस्तान सरकार आणि तिथं असलेल्या दहशतवादी संघटनांवर राग आहे. पण तिथल्या सामान्य नागरिकांबद्दल नाही. मुलीच्या उपचारासाठी मदत मिळावी ही विनंती आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी मान्य केली आणि व्हीसा मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आशा आहे की मुलीवर चांगले उपचार होतील.

बाबा, ALL THE BEST! धनंजय मुंडेंच्या गोंडस मुलीचा VIDEO एकदा पाहाच

First published: October 21, 2019, 3:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading