IPL 2019 : भाजपच्या 'या' नेत्याची आता क्रिकेट कॉमेंट्री

भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच गंभीर माईक घेऊन उतरला, तो आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी नाही तर याकरिता...

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 07:24 PM IST

IPL 2019 : भाजपच्या 'या' नेत्याची आता क्रिकेट कॉमेंट्री

कोलकता, 24 मार्च : आयपीएलच्या 12 व्या हंगामाला शनिवार 23 मार्चपासून सुरुवात झाली. रविवारचा पहिला सामना ईडन गार्डनवर कोलकत्ता नाइट रायडर्सचा आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. पण हा सामना सुरु होण्याआधीच आयपीएलचे आकर्षण ठरला तो भाजपमध्ये प्रवेश केलेला भारतीय माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर. भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच गंभीर माईक घेऊन उतरला, तो आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी नाही तर, आयपीएलच्या सामन्याचे कॉमेंट्री (समालोचन) करण्यासाठी. गौतम गंभीरने याआधीही समालोचन केले आहे. मात्र आता राजकारण प्रवेशानंतर पहिल्यांदाच तो क्रिकेटच्या मैदानावरील खेळाचे समालोचन करणार आहे. गंभीरने दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गौतम गंभीर त्याच्या आक्रमक आणि सडेतोड बोलण्यासाठी ओळखला जातो. त्याने आयपीएल सुरु होण्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीवर टीका केली होती. मात्र, गौतम गंभीर लोकसभेसाठी अजून तरी कोणतीही जागा देण्यात आलेली नाही, मात्र दिल्ली मतदारसंघातून गंभीर उभा राहू शकतो.


वाचा : IPL 2019 : सचिनला शून्यावर बाद करणारा 'हा' खेळाडू झाला कर्णधार


रविवारचा पहिला सामना कोलकता विरुध्द हैदराबाद यांच्यात होणार आहे. दरम्यान, दिनेश कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकता संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर, हैदराबाद संघाचे नेतृत्व भारताचा जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमार करणार आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादसाठी डेव्हिड वॉर्नरचे पुनरागमन महत्त्वाचे ठरणार असले तरी, आपला माजी कर्णधार केन विलियमसन यांची कमतरता संघाला जाणवणार आहे. डेव्हिड वॉनर आणि जॉनी बेयरस्टो या सलामीच्या फलंदाजांनी हैदराबादसाठी तुफान फलंदाजी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 04:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...