IPL 2019 : गंभीर म्हणतो...'हे' खेळाडू पंजाबच्या पराभवाला कारणीभूत

IPL 2019 : गंभीर म्हणतो...'हे' खेळाडू पंजाबच्या पराभवाला कारणीभूत

या दोन खेळाडूंच्या चुकीमुळं पंजाबनं गमावला सामना, त्याचा चेन्नईला झाला फायदा.

  • Share this:

चेन्नई, 07 एप्रिल : धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जनं पुन्हा विजयीपथावर येत पंजाबचा पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करत, डुप्लेसीच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने 20 षटकात 3 बाद 160 धावा केल्या आणि पंजाबसमोर 161 धावांचे आव्हान ठेवले.

161 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अडखळत झाली. दुसऱ्या षटकात ख्रिस गेल आणि मयंक अगरवाल लागोपाठ बाद झाले. गेलने 5 धावा तर मयांक शून्यावर बाद झाला. त्यानंतर लोकेश राहुल आणि सर्फराज खानने 110 धावांची भागिदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी आपलं अर्धशतक पुर्ण केलं. तेव्हा पंजाबला विजयाच्या आशा निर्माण झाल्या होत्या. मात्र, त्यांच्यानंतरचे फलंदाज धावा करू शकले नाहीत. या सामना दरम्यान समालोचन करताना गौतम गंभीर, इरफान खान आणि आकाश चोप्रा यांनी राहुल आणि सरफराज यांच्यावरच टीका केली. यावेळी गंभीरनं आक्रमक होतं. पंजाबच्या पराभवाकरिता राहुल आणि सरफराज यांना कारणीभूत ठरवलं आहे. आपलं अर्धशतक पुर्ण करण्याच्या नादात या फलंदाजांनी सावध फलंदाजी केली. त्यामुळंच पंजाबला हाता तोंडाशी आलेला सामना गमवावा लागला अशी टीका केली.

समालोचन करताना गंभीरनं, कोणताही लक्ष्याचा पाठलाग करताना प्रत्येक संघाचा एक प्लॅन असतो. मैदानात चांगल्य फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजानं आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून देणं गरजेचं असतं. पण राहुल आणि सरफराज यांनी तसे केले नाही, अशी सडेतोड टीका केली. तसेच, सरफराजला फिरकी गोलंदाजांची भिती वाटते, असेही गंभीर म्हणाला.

VIDEO: चड्डी-बनियान गँगचा पेट्रोल पंपावर दरोडा; दरोडेखोर CCTV कॅमेऱ्यात कैद

First published: April 7, 2019, 9:05 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading