IPL 2019 : ...म्हणून RCB एकही सामना जिंकू शकली नाही, गंभीरची बोचरी टीका

IPL 2019 : ...म्हणून RCB एकही सामना जिंकू शकली नाही, गंभीरची बोचरी टीका

सलग सहाव्या पराभवानं आरसीबीचं आयपीएलच्या बाद फेरीत प्रवेश करणं कठीण झालं आहे.

  • Share this:

बंगळुरू, 08 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामाचा प्रवास विराट कोहलीसाठी त्रासदायक ठरत आहे. कारण या हंगामाला सुरूवात होऊन दोन आठवडे उलटले तरी, विराटच्या रॉयस चॅलेंजर्स बंगळुरू संघाला एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. दिल्लीच्या विरोधात रविवारी झालेल्या सामन्यातही बंगळुरू संघाला पराभव स्विकारावा लागला.

सलग सहा सामन्यात पराभव पत्करल्यानंतर विराटनं गोलंदाजांवर याचे खापर फोडले, मात्र माजी क्रिकेटर गौतम गंभीर यानं विराटवर टीका करत, पराभवाची जबाबदारी कर्णधारानं घ्यावी अशी बोचरी टीका केली. तसंच, विराट हा नवशिका कर्णधार असल्यामुळं त्याचे परिणाम संघाला भोगावे लागत आहेत असंही गंभीर म्हणाला. गंभीरची विराटवर टीका करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही विराटच्या कर्णधारपदावर गंभीरनं प्रश्न उपस्थित केले होते.

गंभीरच्या मते, ''आयपीएलच्या या हंगामात बंगळुरू संघ चांगली कामगिरी करु शकला नाही, याला त्यांची निवड समितीही तेवढीच जबाबदार आहे. लिलावात बंगळुरू संघानं मार्कस स्टोईनीस आणि नॉथन कुल्टर नाईल यांना रिटेन का केलं, जर त्यांना माहीत होते ही हे दोन खेळाडू संघासाठी उपलब्ध असणार नाहीत, असा सवालही गंभीरनं केला. तसेच, चिन्नास्वामी स्टेडियम जलद गोलंदाजांसाठी पुरक असताना, विराटनं फिरकी गोलंदाजांचा जास्त वापर केला. पराभवाचं खापरही गोलंदाजांवर फोडले. कर्णधारानं पराभवाची जबाबदारी स्वत:वर घ्यायची असते'', अशी खोचक टीका गंभीरनं विराटवर केली. याआधीही गंभीरनं विराटनं बंगळुरू संघाचे आभार मानावे, कारण सामने हरुनही त्याला कर्णधार पदावर कायम ठेवले आहे.

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात बंगळुरू संघानं 150 धावांचे आव्हान दिले होते. दिल्लीनं 6 गड्यांच्या मोबदल्यात 18.5 षटकांत हे आव्हान पूर्ण केले. या पराभवाने आरसीबीचं आयपीएलच्या बाद फेरीत प्रवेश करणं कठीण झालं आहे. कसिगो राबाडाच्या भेदक माऱ्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीनं आरसीबीवर विजय मिळवला.

बिर्याणीवरून आधी वाद..नंतर हाणामारी, काँग्रेस कार्यकर्त्यांचा VIDEO समोर

First published: April 8, 2019, 7:53 AM IST

ताज्या बातम्या