नवी दिल्ली, 04 मे : पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार आणि क्रिकेटवर्तुळात बुम बुम या नावानं ओळखला जाणारा शाहिद आफ्रिदी नेहमीचा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. दरम्यान आता सध्या आफ्रिदी आपल्या गेम चेंजर या आत्मचरित्रामुळं चर्चेत आला आहे.
आफ्रिदीनं आपल्या आत्मचरित्रात अनेक खेळाडूंवर भाष्य केलं आहे. त्यातच त्यानं भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सलमीचा फलंदाज गौतम गंभीरवर जोरदार टिका केली. आपल्या आत्मचरित्रात त्यानं गंभीरकडे व्यक्तीमत्वच नसून तो केवळ एक अहंकारी खेळाडू आहे, अशी टिका केली आहे. आपल्या ‘गेम चेंजर’ या आत्मचरित्रामध्ये केली होती.
मात्र त्याच्या या टीकेला गंभीरने सडेतोड उत्तर दिले आहे. गंभीरनं ट्विट करत, ‘आफ्रिदी, तू केलेली टीका ही खूपच हास्यास्पद आहे. असे असले तरी, आम्ही अजूनही पाकिस्तानी नागरीकांना वैद्यकीय उपचारांसाठी लागणारा व्हिसा मंजूर करणे बंद केलेले नाही. त्यामुळं तु भारतात या मी स्वतः तुला मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाईन’, आफ्रिदीची थट्टा केली.
आफ्रिदीनं आपल्या पुस्तकात गंभीरबरोबरच्या नात्याचा खुलासा केला आहे. या आत्मचरित्रात त्यानं गंभीरबद्दलचा सगळा राग त्याने आपल्या लिखाणातून व्यक्त केला आहे. आफ्रिदीनं,''गंभीर एकदमच विचित्र आहे. गंभीर आणि त्याचा अहंकार काय बोलणार याबद्दल. गंभीरकडे व्यक्तीमत्वच नाही. क्रिकेटसारखा महान खेळ खेळणाऱ्या गंभीरकडे व्यक्तीमत्वच नाही आहे. त्याच्या नावावर विक्रमही नाहीत तर केवळ अहंकार आहे'', अशा शब्दात टीका केली आहे.
@SAfridiOfficial you are a hilarious man!!! Anyway, we are still granting visas to Pakistanis for medical tourism. I will personally take you to a psychiatrist.
— Chowkidar Gautam Gambhir (@GautamGambhir) May 4, 2019
वयाबाबतही केला खोटा दावा
आफ्रिदीनं आपल्या पुस्तकात आपल्या वयाबाबतही खुलासा केला आहे. यामुळं आफ्रिदीचा खोटारडेपणा उघड झाला आहे. त्यानं पुस्तकात माझा जन्म १९८० सालचा नव्हे, तर १९७५ चा आहे, असे स्पष्ट केले आहे. श्रीलंकेविरोधात १९९६ मध्ये मी ३७ चेंडूत शतक झळकावलं, तेव्हा मी १६ नव्हे १९ वर्षांचा होता, अस स्पष्टीकरण शाहिदनं आपल्या आत्मचरित्रातून दिलं आहे. सध्या वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकावणाऱ्या वीरांच्या यादीत आफ्रिदी अव्वल क्रमांकावर आहे. मात्र आता त्याच्या नावावरचा हा विक्रम काढला जाऊ शकतो.
VIDEO : राहुल गांधींनी 'त्या' कंपनीसाठी अमिताभ बच्चनच्या भावाचा पत्ता दिला, जेटलींचा आरोप