शानदार फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलवर खुश नाहीत दिग्गज क्रिकेटपटू, ‘हे’ आहे कारण

शानदार फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलवर खुश नाहीत दिग्गज क्रिकेटपटू, ‘हे’ आहे कारण

न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत शानदार प्रदर्शन केल्यानंतर आता एकदिवसीय मालिकेतही राहुल चांगली कामगिरी करत आहे.

  • Share this:

हॅमिल्टन, 07 फेब्रुवारी : टीम इंडियाचा फलंदाज केएल राहुल (KL Rahul) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत शानदार प्रदर्शन केल्यानंतर आता एकदिवसीय मालिकेतही राहुल चांगली कामगिरी करत आहे. राहुलच्या फॉर्ममुळे संघातील काही समस्या सुटल्या असल्या तरी, दिग्गज फलंदाज यावर खुश नाही आहेत. राहुल सलामीबरोबरच तिसऱ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. राहुलच्या खेळीवर टीम मॅनेजमेंट आणि फॅन्स खुश असले तरी गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि आकाश चोप्रा (Aakash Chopra) खुश नाही आहेत. दरम्यान, पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांच्या चांगल्या कामगिरीनंतरही भारताला पराभव सहन करावा लागला. भारत-न्यूझीलंड यांच्यात दुसरा सामना 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

वाचा-केएल राहुलच्या फॉर्मने फक्त पंतचे नाही तर दिग्गज क्रिकेटपटूंचेही करिअर संपवले

एकीकडे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) असे संकेत दिले आहेत की राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करेल आणि विकेटकीपरचीही भुमिका पाडेल. मात्र विराटच्या या मताशी गंभीर आणि आकाश चोप्रा सहमत नाही आहेत. कारण राहुलला विकेटकिपींगबरोबरच मधल्या फळीत फलंदाजीसाठी येणे योग्य नाही आहे, असे मत आकाश चोप्रा आणि गंभीरने व्यक्त केले.

वाचा-विराटच्या एका चुकीमुळे खेळाडूंना मिळणार नाहीत पूर्ण पैसे

राहुलने सलामीला यावे

एकदिवसीय क्रिकेटमध्ये राहुलने सलामीली फलंदाजीसाठी यावे, किपिंग करू नये, असे मत दोन्ही क्रिकेटपटूंनी व्यक्त केले. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत गंभीरने राहुलला सलामीला न पाठवण्याचा निर्णय अयोग्य आहे, असे सांगितले. तर, आकाश चोप्राने ईएसपीएन क्रिक्इंफोला, विकेटकीपिंग केल्यामुळं राहुलला दुखापत होण्याची शक्यता जास्त आहे. जे भारताला परवडणार नाही. कारण किपिंग केल्यानंतर लगेचच त्याला फलंदाजी करावे लागते. शरिरावर एवढा भार योग्य नाही, असे मत व्यक्त केले. आकाश चोप्राने, अडम गिलक्रिस्टचे उदाहरण दिले. गिलख्रिस्ट करिअरच्या सुरूवातीपासूनच विकेटकीपिंग करत होता, त्यामुळं त्याच्या शरिराला याची सवय झाली होती. त्यांनी संजू सॅमसन आणि ईशान किशन यांना संधी देण्याविषयी मत व्यक्त केले.

वाचा-U19 World Cup: बांगलादेशची पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक, भारताला देणार आव्हान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2020 08:53 AM IST

ताज्या बातम्या