भारताला वर्ल्ड चॅम्पियन करणारे गॅरी कर्स्टन आता होणार 'या' संघाचे कोच!

भारताला वर्ल्ड चॅम्पियन करणारे गॅरी कर्स्टन आता होणार 'या' संघाचे कोच!

दक्षिण आफ्रिकाचे माजी कर्णधार गॅरी कर्स्टन आता नव्या संघाचा प्रशिक्षक बनला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : दक्षिण आफ्रिकाचे माजी कर्णधार गॅरी कर्स्टन आता नव्या संघाचा प्रशिक्षक बनला आहे. भारतीय संघाला 2011मध्ये वर्ल्ड कप जिंकून देणारा गॅरी, क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी प्रशिक्षक मानले जातात. आयपीएलमध्ये गॅरीनं रॉयल चॅलेंजर्च बंगळूरू संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले होते. मात्र आता गॅरी एका नव्या टी-20 संघाचा प्रशिक्षक होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीरी गॅरी कर्स्टन पुढच्या वर्षी सुरू होणाऱ्या द हंडरेड लीगमध्ये कार्ड़िफ पुरुष संघाचा प्रशिक्षक होणार आहे. त्यामुळं बऱ्याच काळापासून या संघाच्या प्रशिक्षकाचा शोध संपल आहे. तर, ऑस्ट्रेलिया महिला संघाला टी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारे प्रशिक्षक मॅथ्यू मॉटला कार्डिफ संघाच्या महिला संघाचे प्रशिक्षकपद दिले आहे. टीम इंडिया आणि आयपीएल यांना कोचिंग देण्याशिवाय गॅरी यांनी बिग बॅश लीगमध्येही प्रशिक्षक म्हणून काम केले होते.

वाचा- पाक क्रिकेटपटू भारतीय मुलीसोबत 20 ऑगस्टला अडकणार विवाहबंधनात!

आपल्या नव्या संघासोबत काम करण्याआधी गॅरी यांनी, "मी इंग्लिश अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डासोबत कधीच काम केलेले नाही. ही एक सुवर्ण संधी आहे. मला खात्री आहे की, ही स्पर्धा लोकप्रिय होईल", असे सांगितले.

तर, मॅथ्यू मॉट यांनी, "ही स्पर्धा महिला क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण आहे. ही स्पर्धा सफल होईल, या लीगमध्ये 100 चेंडूंचा सामना होईल. एक ओव्हर दहा चेंडूचाही असणार आहे, त्यामुळं ही स्पर्धा खुप वेगळी आहे आणि रोचक आहे.

वाचा-विराट किती शतकं करणार? भारताच्या माजी क्रिकेटपटूनं केली ही भविष्यवाणी

भारतीय संघाचा कोच होण्यासाठी गॅरी यांनी नाही केला अर्ज

2011मध्ये भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकून देणारा गॅरीनं भारतीय संघाच्या कोचसाठी पुन्हा अर्ज केला नाही. वर्ल्ड कप 2019नंतर बीसीसीआयनं नव्या प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. यात रवी शास्त्री, टॉम मूडी, लालचंद राजपूत, रॉबीन सिंग, माईक हेसन, फिल सिमन्स ही नावे अंतिम करण्यात आली आहेत.

वाचा-प्रशिक्षकपदाची चुरस अंतिम टप्प्यात, रवी शास्त्रीसह 'हे' पाच जण आहेत स्पर्धेत!

तुम्ही पाहू नाही शकणार असा VIDEO, शाळेच्या संचालकाने विद्यार्थ्यांना केली बेदम मारहाण

Published by: Suraj Yadav
First published: August 13, 2019, 1:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading