Run Outवरून भरमैदानात तू-तू, मैं-मैं! क्रिकेट पीचवरचा मजेदार VIDEO पाहिलात का?

Run Outवरून भरमैदानात तू-तू, मैं-मैं! क्रिकेट पीचवरचा मजेदार VIDEO पाहिलात का?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच संघातील फलंदाज भिडले, मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

  • Share this:

क्वालालंपूर, 26 सप्टेंबर : क्रिकेटच्या सामन्यात अनेकवेळा खेळाडू एकमेकांशी भांडण किंवा वाद करताना दिसतात. तर, कधी कधी असे प्रसंग पाहायला मिळतात जेव्हा खेळाडू हास्यास्पदरित्या बादही होतात. मात्र सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. बुधवारी क्वालालंपूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात एक मजेशीर प्रसंग घडला. यावेळी एकाच संघातील दोन खेळाडू एकमेकांविरोधात भिडले.

क्वालालंपूरच्या किनरारा ओव्हल अकादमी (Kinrara Academy Oval) येथे कॅनडा आणि डेनमार्क यांच्यात झालेल्या CWC Challenge League Group A मॅच दरम्यान विकेटमध्ये धावा काढण्याच्या नादात झालेल्या चुकीचा फटका संघाला बसला. यावळी दोन्ही फलंदाजांमध्ये तू-तू, मैं-मैंचा प्रसंग घडला. कॅनडाचा फलंदाज हमजा तारिकनं आपल्या शॉटवर एक धाव काढली. त्यानंतर दुसरी धाव काढण्याच्या नादात हमजा आणि त्याचा साथिदार फलंदाज रवींद्र पाल सिंग एकाच बाजूला आले. धावा काढत असताना याचा अंदाज दोन्ही फलंदाजांना आला नाही. त्यामुळं डेनमार्कच्या क्षेत्ररक्षक अब्दुल हाशमीनं जोनस हेनरिक्सनच्या थ्रोवर संधी न दवडता बाद केले.

त्यामुळं एकाच बाजूला कॅनाडाचे दोन फलंदाज बाद झाले. त्यानंतरही कोण नक्की बाद झालं याचा अंदाज पंचांनाही लावता आला नाही. त्यामुळं दोन्ही फलंदाजांमध्ये तु-तु, मैं-मैचा प्रसंग घडला. हा व्हिडिओ cricket world cup आणि आयसीसीनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला.

पालकांनी घेतला बदला, वर्गात घुसून शिक्षकाला चोपले LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2019 11:23 AM IST

ताज्या बातम्या