आजपासून भारत-वेस्ट इंडीज आमनेसामने

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या वन-डे क्रिकेट मालिकेस आजपासून (शुक्रवार) सुरुवात होत असून, पोर्ट ऑफ स्पेन येथे मालिकेतील सलामीचा सामना होणार आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 23, 2017 02:39 PM IST

आजपासून भारत-वेस्ट इंडीज आमनेसामने

23 जून : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पाच सामन्यांच्या वन-डे क्रिकेट मालिकेस आजपासून (शुक्रवार) सुरुवात होत असून, पोर्ट ऑफ स्पेन येथे मालिकेतील सलामीचा सामना होणार आहे.

या मालिकेच्या तोंडावर भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील वादाची चर्चा सुरू असली, तरी मालिकेत भारताचाच संघ वरचढ मानला जात आहे.

जेसन होल्डच्या नेतृत्वाखालील विंडीज संघाला अलीकडेच अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत १-१ ने बरोबरीवर समाधान मानावं लागलं. यजमान संघाच्या तुलनेत भारतीय संघाचा दर्जा वरचा आहे. कोहलीला याची चांगली कल्पना आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून कुंबळे प्रकरणात समर्थन मिळाल्यानंतर भारतीय कर्णधाराला आता चूक करण्याची विशेष संधी राहणार नाही. भारतीय संघ वन-डे सामन्यांच्या मालिकेत ५-० ने बाजी मारण्याची शक्यता आहे.

भारत :- विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, रिषभ पंत, दिनेश कार्तिक आणि उमेश यादव.

वेस्ट इंडिज :- जेसन होल्डर (कर्णधार), जोनाथन कॉर्टर, मिगुलएल कमिंस, अल्जारी जोसेफ, जेसन मोहम्मद, किरन पॉवेल, केसरिक विलियम्स, देवेंद्र बिशू, रोस्टन चेज, शाई होप, एविन लुईस, अ‍ॅश्ले नर्स व रोवमॅन पॉवेल.

Loading...

सामना (भारतीय वेळेनुसार) :- संध्याकाळी ६ वाजल्यापासून.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2017 02:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...