Road Safety World Series : 'हे' निवृत्त क्रिकेटपटू पुन्हा दिसणार मैदानावर

Road Safety World Series : 'हे' निवृत्त क्रिकेटपटू पुन्हा दिसणार मैदानावर

Road Safety World Series: सचिन तेंडूलकर, सनथ जयसूर्या , वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा सारखे निवृत्त झालेले दिग्गज खेळाडू आता पुन्हा एकदा लवकरच क्रिकेटच्या मैदानात दिसून येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी : नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केलेले युसूफ पठाण, नमन ओझा आणि विनय कुमार हे खेळाडू 5 मार्चपासून नवी दिल्लीत सुरू होत असलेल्या रस्ते सुरक्षा विश्व मालिकेत (Road Safety World Series) इंडियन लीजंड्स संघाचं (IndiaLegends) प्रतिनिधित्व करणार आहेत. 1996 मधील विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेला अजिंक्यपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा आक्रमक सलामीवीर सनथ जयसूर्या (Sanath Jaysurya) श्रीलंका लीजंड्स संघाकडून मैदानात उतरणार आहे.

शनिवारी जाहीर झालेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, तिलकरत्ने दिलशानच्या नेतृत्वाखालील श्रीलंका लीजंड्स (Sri Lanka Legends) संघात जयसूर्याव्यतरिक्त रसेल अरनॉल्ड, उपुल थरंगा यांसारख्या क्रिकेटपटूंचादेखील समावेश आहे. इंडियन लीजंड्स आपली पहिली मॅच 5 मार्च रोजी बांगलादेश लीजंड्सविरुद्ध खेळेल. 6 मार्चला श्रीलंका लीजंड्स आणि वेस्ट इंडिज लीजंड्स या संघांदरम्यान मॅच होईल. या स्पर्धेतील सर्व मॅचेस रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर होतील. देशात रस्ते सुरक्षेविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने या टी 20 मॅचेस खेळल्या जाणार आहेत. कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) या स्पर्धेतील पहिले सत्र 4 मॅचेसनंतर 11 मार्चला तहकूब करण्यात आलं होतं.

अवश्य वाचा - IND vs ENG: इंग्लंडला धोक्याचा इशारा, ‘या’ भारतीय बॅट्समननं झळकावलं दुसरं शतक

असे आहेत संघ:

इंडियन लीजंड्स :

सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग, युवराज सिंह, मोहंमद कैफ, प्रज्ञान ओझा, नोएल डेव्हिड, मुनाफ पटेल, इरफान पठाण, मनप्रीत गोनी, युसुफ पठाण, नमन ओझा, एस. बद्रिनाथ आणि विनय कुमार.

श्रीलंका लीजंड्स :

तिलकरत्ने दिलशान, सनथ जयसूर्या, फरवीज महरुफ, रंगना हेराथ, थिलन तुषारा, अजंता मेंडीस, चमारा कपुगेदेरा, उपुल थरंगा, चामरा सिल्वा, चिन्तका जयसिंघे, धम्मिका प्रसाद, नुवान कुलशेखरा, रसेल अर्नाल्ड, दुलंजना विजेसिंघे आणि मलिंदा वारनपुरा.

वेस्ट इंडिज लीजंड्स :

ब्रायन लारा, टिनो बेस्ट, रिडली जेकब्ज, नरसिंह देवनारायण, सुलेमान बेन, दीनानाथ रामनारायण, एडम सॅनफोर्ड, कार्ल हूपर, ड्वेन स्मिथ, रेयॉन आस्टीन, विलियम पार्किन्स आणि महेंद्र नागामुटू.

दक्षिण आफ्रिका लीजंड्स :

ब्रायन लारा, मोर्ने वान विक, गार्नेट क्रुगर, रोजर टेलीमाक्स, जस्टिन केम्प, अल्विरो पीटरसन, नैंटी हेवर्ड, अँड्र्यू पुटिक, लुटस बोसमन, जेंडर डी ब्रुईन, थांडी ताशाबाला, मोंडे जोंडेकी, मखाया एनटिनी आणि लॉयड नॉरेस जोन्स.

First published: February 28, 2021, 10:50 PM IST

ताज्या बातम्या