• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • Team India च्या कोचला मिळणार इतका पगार, कॅप्टनलाही टाकणार मागे!

Team India च्या कोचला मिळणार इतका पगार, कॅप्टनलाही टाकणार मागे!

टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कपनंतर (Team India T20 World Cup) नवीन कोच मिळणार आहे. रवी शास्त्री (Ravi Shastri Head Coach) यांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे या पदासाठी बीसीसीआयने (BCCI) शोधाशोधही सुरू केली आहे.

  • Share this:
    मुंबई, 19 ऑक्टोबर : टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कपनंतर (Team India T20 World Cup) नवीन कोच मिळणार आहे. रवी शास्त्री (Ravi Shastri Head Coach) यांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे या पदासाठी बीसीसीआयने (BCCI) शोधाशोधही सुरू केली आहे, तसंच या पदासाठी अर्जही मागवण्यात आले आहेत. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) टीमचा मुख्य प्रशिक्षक होईल, अशी शक्यता आहे. सुरुवातीला राहुल द्रविड या पदासाठी तयार नव्हता, पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी द्रविडला तयार केल्याचं वृत्त आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविडला वर्षाला 10 कोटी रुपये पगार मिळू शकतो. 25 वर्षांपूर्वी कोच म्हणून मदन लाल यांना प्रत्येक महिन्याला 5 लाख रुपये मिळत होते. बीसीसीआय सध्या विराट कोहलीला वार्षिक कराराचे 7 कोटी रुपये देते, म्हणजेच द्रविड कोच झाला तर त्याला विराट कोहलीपेक्षा जास्त पगार मिळेल. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार कोच रवी शास्त्री यांना 9.5 कोटी ते 10 कोटी रुपयांच्या आसपास मानधन मिळतं. जगातल्या इतर प्रशिक्षकांपेक्षा ही रक्कम सर्वाधिक आहे. शास्त्री प्रशिक्षक असताना टीम इंडियाने परदेशात ऐतिहासिक विजय मिळवले. टीमने ऑस्ट्रेलियात दोनदा टेस्ट सीरिज जिंकली, तर इंग्लंडमध्ये 2-1 ने आघाडी घेतली. भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्येही पोहोचली, पण टीमला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. 1996-97 मदनलाल कोच 1996-97 साली मदन लाल (Madan Lal) टीम इंडियाचे कोच होते, तेव्हा त्यांना महिन्याला 5 लाख रुपये पगार मिळायचा. यानंतर 1999-2000 साली कपिल देव (Kapil Dev) यांना ही जबाबदारी देण्यात आली तेव्हा त्यांना प्रत्येक मॅचचे 4 लाख रुपये आणि अतिरिक्त बोनस दिला जायचा. शास्त्री 2017 साली टीमचे कोच झाले तेव्हा त्यांना वर्षाला 8 कोटी रुपये मिळायचे, 2019 साली यात 20 टक्क्यांनी वाढ झाली. कुंबळेला 6 कोटी रुपये 2016-17 च्या दरम्यान अनिल कुंबळे (Anil Kumble) टीम इंडियाचा कोच होता, तेव्हा त्याला वर्षाला 6 कोटी रुपये मिळायचे. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला, यानंतर विराट कोहली आणि कुंबळे यांच्यात वाद झाले, त्यामुळे कुंबळेने आपल्या पदाचा राजीनामा दिला. परदेशी प्रशिक्षकांमध्ये जॉन राईट (John Wright) 2000 ते 2005 पर्यंत टीम इंडियाचे प्रशिक्षक होते, तेव्हा त्यांना वर्षाला एक कोटी रुपये पगार मिळायचा. ग्रेग चॅपल (Greg Chappell) यांनी ही जबाबदारी 2005 ते 2007 मध्ये स्वीकारली. चॅपल यांना बीसीसीआय वर्षाला 1.25 कोटी रुपये द्यायची. तर दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन (Garry Kirsten) 2008 ते 2011 पर्यंत टीमचे मुख्य प्रशिक्षक असताना त्यांना जवळपास 2.5 कोटी रुपये मिळायचे. याशिवाय डंकन फ्लेचर (Duncan Fletcher) 2011-2015 मध्ये टीमचे कोच होते, त्यांनाही वर्षाला 4.2 कोटी रुपयांचं मानधन मिळायचं. वादामुळे परदेशी कोच नाही ग्रेग चॅपल यांच्या कार्यकाळात टीमच्या बड्या खेळाडूंसोबत खासकरून सौरव गांगुलीसोबत त्यांचे संबंध खराब राहिले. गांगुलीला टीममधून बाहेर करण्यात आलं. एवढच नाही तर 2007 वर्ल्ड कपच्या पहिल्याच राऊंडमध्ये टीम स्पर्धेबाहेर झाली, त्यामुळे आता बीसीसीआय परदेशी प्रशिक्षक ठेवण्याच्या विचारात नाही.
    Published by:Shreyas
    First published: