Home /News /sport /

French Open 2022 मध्ये महिला खेळाडूने घातला असा ड्रेस, अंपायर म्हणाला 'कपडे बदलून ये'!

French Open 2022 मध्ये महिला खेळाडूने घातला असा ड्रेस, अंपायर म्हणाला 'कपडे बदलून ये'!

फ्रेंच ओपनच्या (French Open 2022) या मोसमात नेहमीप्रमाणेच रोमांचक सामने पाहायला मिळाले, पण यातल्या एका सामन्यात वादही झाला. इटलीची टेनिसपटू कॅमिला गिओर्गी (Camila Giorgi) फ्रेंच ओपनच्या थर्ड राऊंडमध्ये मॅच खेळायला उतरली तेव्हा अंपायरने तिला बोलावून घेतलं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 3 जून : फ्रेंच ओपनच्या (French Open 2022) या मोसमात नेहमीप्रमाणेच रोमांचक सामने पाहायला मिळाले, पण यातल्या एका सामन्यात वादही झाला. महिला टेनिसपटू जेव्हा मॅच खेळण्यासाठी कोर्टवर उतरली तेव्हा अंपायरने तिच्या ड्रेसवर आक्षेप घेतले, तसंच तिला कपडे बदलून खेळायला ये, असे आदेशही अंपायरने दिले. इटलीची टेनिसपटू कॅमिला गिओर्गी (Camila Giorgi) फ्रेंच ओपनच्या थर्ड राऊंडमध्ये मॅच खेळायला उतरली तेव्हा अंपायरने तिला बोलावून घेतलं. कॅमिलाने घातलेला ड्रेस योग्य नसल्याचं अंपायरने सांगितलं, तसंच नियमाप्रमाणे तुला कपडे बदलावे लागतील, असा इशाराही दिला, कॅमिला गिओर्गीने मात्र आपण दुसरा ड्रेस आणलेला नाही, त्यामुळे माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया दिली. कॅमिलाच्या ड्रेसवर असलेल्या स्पॉन्सरच्या जाहिरातीवरून हा वाद झाला. ड्रेसवरची जाहीरात मोठी असल्यामुळे हे नियमाच्याविरुद्ध असल्याचं मत अंपायरने मांडलं. कॅमिलाने जेव्हा तिच्याकडे दुसरा ड्रेस नसल्याचं सांगितलं तेव्हा अंपायरने तिला मॅच खेळण्याची परवानगी दिली, पण नंतर यावर कारवाई होईल, असं स्पष्ट केल. जागतिक क्रमवारीत 30व्या क्रमांकावर असलेल्या कॅमिलाचा या सामन्यात 4-6, 6-1, 6-0 ने विजय झाला. कॅमिला जिओर्जीचे इन्स्टाग्रामवर 6 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ती कायमच इन्स्टाग्रामवर तिचे हॉट फोटो पोस्ट करत असते. मागच्या वर्षी विम्बलडन चॅम्पियनशीपच्या आधीही कॅमिलाने काही फोटो पोस्ट केले होते, ज्यामुळे ती चर्चेत आली होती. तसंच या फोटोंमुळे बराच वादही झाला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या