French Open 2019 : नदालचं क्ले किंग ! सरळ सेटमध्ये फेडररचा केला पराभव

French Open 2019 : नदालचं क्ले किंग ! सरळ सेटमध्ये फेडररचा केला पराभव

फेडररने क्ले कोर्टवर नदालला एकदाही पराभूत केलेले नाही.

  • Share this:

पॅरिस, 07 जून : फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलमध्ये आज फेडरर आणि नदाल यांच्यात झालेल्या महामुकाबल्यात राफेल नदालनं सरळ विजय मिळवला. नदालनं फेडररला 6-3, 6-4, 6-2 अशा सरळ तीन सेटमध्ये नमवले. याशिवाय नदालनं आता थेट अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

क्ले किंग म्हणून ओळख असलेल्या नदालनं या सामन्यातही आपणचं बादशहा असल्याचे दाखवून दिले. दरम्यान, फेडररने क्ले कोर्टवर नदालला एकदाही पराभूत करता आलेले नाही आणि यंदाही तोच कित्ता कायम राहिला. 2017 साली झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन अंतिम सामन्यानंतर या दोन्ही खेळाडूंमध्ये पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम लढत झाली.

हे दोन्ही खेळाडू आतापर्यंत एकूण 39व्यांदा एकमेकांविरुद्ध खेळले असून त्यात नदाल 24-15 असा वरचढ ठरला आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या नदालनं आतापर्यंत 11 वेळा फ्रेंच ओपनचे जेतेपद उंचावले आहे. अंतिम लढतीत नदालचा सामना हा नोव्हाक जोकोव्हीच आणि डॉमिनिक थिएम यांच्यातील विजेत्याचे आव्हान असणार आहे.

वाचा- World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन

वाचा-धोनीच्या मुद्द्यावरून पाकिस्तानात रणकंदन ; ‘तो क्रिकेट खेळायला गेला आहे, महाभारतासाठी नाही'

वाचा- #DhoniKeepTheGlove : ‘पाकिस्तानच्या खेळाडूंचा नमाज चालतो, मग धोनीचे ग्लोव्ह्ज का नाही’ ; चाहते संतापले

SPECIAL REPORT : धोनीच्या ग्लोव्ह्जवरून का पेटला वाद, आयसीसीचा काय आहे आक्षेप?

First published: June 7, 2019, 7:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading