Home /News /sport /

French Open 2021: जोकोविचने चारली स्टेफनोसला 'धूळ', फ्रेंच ओपन जिंकून 'जोकर'ने इतिहास घडवला

French Open 2021: जोकोविचने चारली स्टेफनोसला 'धूळ', फ्रेंच ओपन जिंकून 'जोकर'ने इतिहास घडवला

फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये (French Open 2021) नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) स्टेफनोस त्सित्सिपासचा पराभव करत इतिहास घडवला आहे.

    मुंबई, 13 जून : फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये (French Open 2021) नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) स्टेफनोस त्सित्सिपासचा पराभव करत इतिहास घडवला आहे. 52 वर्षांमध्ये महत्त्वाच्या चारही स्पर्धा दोनवेळा जिंकणारा जोकोविच पहिलाच टेनिसपटू ठरला आहे. रोमांचक अशा फायनलमध्ये जोकोविच दोन सेट डाऊन असतानाही त्याने सामना जिंकत आपण महान का आहोत, हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या जोकोविचने 6-7 (6/8), 2-6, 6-3, 6-2, 6-4 ग्रीसच्या 22 वर्षीय त्सित्सिपासचा (Stefanos Tsitsipas) पराभव केला. त्सित्सिपास हा पहिल्यांदाच ग्रॅण्ड स्लॅम फायनल खेळत होता. 34 वर्षांचा जोकोविच रॉजर फेडरर (Roger Federer) आणि राफेल नडाल (Rafael Nadal) यांच्या सर्वाधिक ग्रॅण्ड स्लॅम विजयाच्या विक्रमाशी बरोबरी करण्यापासून एक टायटल दूर आहे. रॉजर फेडरर आणि राफेल नडाल यांनी एकूण 20 ग्रॅण्ड स्लॅम जिंकले आहेत, तर जोकोविचचा हा 19 वा ग्रॅण्ड स्लॅम विजय होता.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या