पॅरिस, 11 ऑक्टोबर : फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये पुन्हा एकदा राफेल नडालचा विजय झाला आहे. नडालने फायनलमध्ये नोवाक जोकोविचचा 6-0, 6-2 आणि 7-5 असा पराभव केला. राफेल नडालचं हे 13वं फ्रेंच ओपन टायटल आहे. याचसोबत नडालने फेडररच्या सर्वाधिक ग्रॅण्ड स्लॅम विजयाचीही बरोबरी केली आहे. नडाल आणि फेडरर यांच्या नावावर आता 20 ग्रॅण्ड स्लॅम आहेत.
@RafaelNadal | #RolandGarros pic.twitter.com/1JbOvlsWiA
— ATP Tour (@atptour) October 11, 2020
राफेल नडालचा हा रोलँड गॅरोसमधला 100वा विजय होता. जोकोविचने पहिला सेट पटकवल्यानंतर नडालने दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये बाजी मारली आणि पुन्हा एकदा आपणच लाल मातीतला बादशाह असल्याचं सिद्ध केलं. तब्बल 2 तास 30 मिनिटं फ्रेंच ओपनची ही फायनल मॅच सुरू होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.