दिग्गज खेळाडूंना नैराश्यातून बाहेर काढलं, त्याच डॉक्टरांनी कोरोनाला कंटाळून केली आत्महत्या

दिग्गज खेळाडूंना नैराश्यातून बाहेर काढलं, त्याच डॉक्टरांनी कोरोनाला कंटाळून केली आत्महत्या

गेली 20 वर्ष जे डॉक्टर खेळाडूंवर उपचार करत होते. त्यांनीच कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आत्महत्या केली.

  • Share this:

रीम्स, 06 एप्रिल : जगातील जवळजवळ प्रत्येक देश कोरोनाव्हायरसच्या संकटात आहे. चीनच्या वुहान शहरातून बाहेर पडलेल्या या प्राणघातक विषाणूमुळे जगातील जवळपास 70 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 12 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. क्रीडविश्वातही कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. मात्र आता क्रीडा जगाशी संबंधित एका व्यक्तीने कोरोनाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

फ्रेंच फुटबॉल क्लबच्या डॉक्टरने आत्महत्या केल्याचे उघडकीस येत असले तरी कोरोना विषाणूची लागण झाल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. फ्रेंच फुटबॉल क्लबचे (French Football Club) रीम्समधील डॉक्टर बर्नाड गोन्झालेझ यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केली.

वाचा-औषधांची नाही गरज, फक्त आवाजाने मारला जाऊ शकतो CoronaVirus; तज्ज्ञांचा दावा

रीम्स क्लबने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बर्नाड गोन्झालेझच्या मृत्यूमुळे रीम्सला मोठा धक्का बसला आहे. केवळ क्लबच नाही, तर रीम्समधील हजारो लोकांनाही यामुळे दुखवले गेले आहे. रीम्सचे नगराध्यक्ष, आर्नार्ड रॉबिनेट यांनी सांगितले की, "गेली 20 वर्षे क्लबमध्ये कार्यरत असलेल्या 60 वर्षीय गोन्झालेझच्या आत्महत्येने मी हादरलो आहे". बर्नाड यांचा कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यादरम्यानच त्यांनी आत्महत्या केली.

वाचा-'ना कपडे राहिले ना चप्पल, बाळाचं दूध पण बंद झालं' मनाला सुन्न करणारा VIDEO

सुसाईट नोटमध्ये केला खुलासा

बर्नाड यांनी आत्मत्येआधी एक पत्र लिहिले होते. या पत्राबाबत रीम्सचे नगराध्यक्ष अर्नार्ड रॉबिनेट यांनी, 'मला असे सांगितले गेले आहे की डॉक्टर बर्नार्ड गोंजालेझ यांनी एक पत्र सोडले आहे ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की त्यांना कोव्हिड-19 संसर्गित असल्याचे आढळले होते. मला धक्का बसला कारण मी त्याला बर्‍याच वर्षांपासून ओळखतो', असे सांगितले. फ्रान्समध्ये कोरोना विषाणूमुळे 8 हजार 000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

वाचा-6 वर्षांच्या मुलानं मृत्यूला हरवलं, फुफ्फुसाच्या आजारानंतर आता कोरोनावर मात

जगभरात हाहाकार

जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत तब्बल 12 लाखांहून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. तर कोरोनाच्या संसर्गामुळे 69 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत तीन लाख 20 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली असून 9 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

First published: April 6, 2020, 1:55 PM IST

ताज्या बातम्या