दोहा-कतार, 27 नोव्हेंबर: कायलीन एमबापेच्या डबल गोल्सच्या जोरावर गतविजेत्या फ्रान्सनं फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम 16 संघांमध्या जागा मिळवली आहे. यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये बाद फेरी गाठणारा फ्रान्स हा पहिलाच संघ ठरला आहे. ग्रुप D मधल्या आपल्या दुसऱ्या सामन्यात फ्रान्सनं डेन्मार्कचा पराभव केला. हा सामना फ्रान्सनं 2-1 अशा फरकानं जिंकला. त्याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फ्रान्सनं 4-1 अशा विजय मिळवला होता. त्यामुळे 6 पॉईंट्ससह फ्रान्सनं गटात अव्वल स्थानासह बाद फेरीही गाठली.
एमबापेचा डबल धमाका
डेन्मार्कविरुद्ध फ्रान्सच्या विजयाचा हीरो ठरला तो स्ट्रायकर कायलीन एमबापे. एमबापेनं या सामन्यात दोन गोल डागले. पहिल्या हाफपर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत होता. त्यानंतर एमबापेनं 61 व्या मिनिटाला पहिला गोल करत फ्रान्सला आघाडीवर नेलं. पण 68 व्या मिनिटालाच क्रिस्टनसेननं गोल करुन डेन्मार्कला बरोबरी मिळवून दिली. मॅच संपण्यासाठी काही मिनिटांचा खेळ बाकी असताना फ्रान्सनं आक्रमणावर भर दिला. याच दरम्यान एमबापे पुन्हा एकदा फ्रान्सच्या मदतीला धावून आला आणि त्यानं 86 व्या मिनिटाला निर्णायक गोल करुन फ्रान्सला जिंकून दिलं. यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये एमबापेनं आतापर्यंत तीन गोलची नोंद केली आहे.
Mbappe goal against Denmark tonight! pic.twitter.com/vawk7IELCZ
— Phil.wells (@philwells87) November 26, 2022
Kylian Mbappe's first France goal against Denmark is amazing, very amazing
pic.twitter.com/qTbvl6Q3yL — Leo Messi (@Messi_10_30) November 26, 2022
हेही वाचा - Cricket: ना पाऊस, ना बॅडलाईट... या अनोख्या कारणासाठी अम्पायर्सनी थांबवली मॅच, पाहा काय घडलं?
फ्रान्स-ट्युनिशिया औपचारिक लढत
बाद फेरीत गाठल्यानंतरही साखळी फेरीत फ्रान्सचा एक सामना अजून बाकी आहे. पण ट्युनिशियाविरुद्धचा हा सामना औपचारिक ठरणार आहे. 2018 च्या वर्ल्ड कपमध्ये फ्रान्सनं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा फ्रेंच आर्मी बाद फेरीत पोहोचली आहे. यंदाच्या वर्ल्ड कपआधी फ्रान्सचा महत्वाचा स्ट्रायकर करीम बेंझेंमा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला. पण तरीही फ्रान्स बाद फेरी गाठण्यात यशस्वी ठरले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: FIFA World Cup, Football, Sports