'मला HIV झालाय', दिग्गज खेळाडूला नाईलाजास्तव करावं लागलं जाहीर!

12 वर्षांपूर्वी ज्या खेळाडूनं समलैंगिक असल्याचं जाहीर केलं होतं. आता एचआयव्ही झाल्याचं सांगताना हतबल असून याबद्दलचे गैरसमज दूर करण्याचा निर्णय घेतला आहे असंही थॉमसने स्पष्ट केलं.

News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2019 08:39 AM IST

'मला HIV झालाय', दिग्गज खेळाडूला नाईलाजास्तव करावं लागलं जाहीर!

लंडन, 16 सप्टेंबर : वेल्सच्या रग्बी टीमसा मादी कर्णधार गेरेथ थॉमस याने मला एचआयव्ही झाला आहे आणि गेल्या काही वर्षांपासून या आजाराशी झुंज देत आहे असं म्हटलं आहे. एचआयव्हीबद्दल लोकांच्या मनात जे गैरसमज आहेत ते दूर करण्याचं आवाहनही त्यानं केलं आहे. 45 वर्षीय थॉमसने व्हिडिओ शेअर करत त्याला एचआयव्ही झाल्याचं जाहीर का करावं लागलं याचाही खुलासा केला आहे.

थॉमसला धमक्यांचे मेल येत होते. त्यामुळं अखेर ही माहिती शेअर केली. तो म्हणाला की, माझ्या आजाराबद्दल माझ्याकडूनच तुम्हाला ही माहिती व्हायला हवी. मला धमकीचे मेल येत आहेत ज्यात एचआयव्हीबद्दल जगाला सांगू असं म्हटलं जातं. त्यांनी सांगण्यापूर्वी मीच सांगावं म्हणून जाहीर करत आहे.

काही वर्षांपूर्वी एचआयव्ही झाल्याचं समजलं होतं. तुम्हाला ही गोष्ट समजल्यावर मी स्वत:ला असुरक्षित समजत आहे पण मी कमकुवत नाही. मी ही गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी हतबल झालो पण मी लढण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी आणि याबाबत असलेल्या गैरसमजांना दूर करण्याचा निर्णय घेतला आहे.

थॉमसने वेल्सकडून खेळताना 1995 ते 2007 दरम्यान 100 सामने खेळले. त्यानं 2005 मध्ये ब्रिटीश आणि आयरिश लॉयन्स टीमचं नेतृत्वही केलं. आंतरराष्ट्रीय रग्बीमधून निवृत्ती घेतल्यानंतर 2009 मध्ये त्यानं समलैंगिक असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर समलैगिकतेच्या भीतीविरुद्ध लढा दिला. पुढच्या आठवड्यात जपानमध्ये होणाऱ्या रग्बी वर्ल्ड कपमध्ये तज्ज्ञ म्हणून थॉमस उपस्थित राहणार आहे.

Loading...

थॉमसने व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याला सोशल मीडियावरून अनेकांनी आधार दिला. काही खेळाडूंनी त्याला खंबीर राहण्याचा सल्ला दिला आहे.

VIDEO: तरुणाचं मानसिक संतुलन बिघडलं, PUBGमुळे बडबडतो 'पुढं हेडशॉट मारतो मी'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: HIV
First Published: Sep 16, 2019 08:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...