अनुष्का शर्मा कॉफी प्रकरणावर एमएसके प्रसादनी मौन सोडलं, विचारला उलट प्रश्न

टीम इंडियाच्या (Team India) निवड समितीला (Selection Committee) चांगल्या कामगिरीचं श्रेय क्वचितच मिळतं, उलट अनेकवेळा त्यांना खेळाडूंची निवड केल्याने तसंच त्यांना डावलल्यामुळे टीका सहन करावी लागते. भारतीय टीमचे माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनाही अनेकवेळा त्यांच्या कार्यकाळात टीकेचा सामना करावा लागला.

टीम इंडियाच्या (Team India) निवड समितीला (Selection Committee) चांगल्या कामगिरीचं श्रेय क्वचितच मिळतं, उलट अनेकवेळा त्यांना खेळाडूंची निवड केल्याने तसंच त्यांना डावलल्यामुळे टीका सहन करावी लागते. भारतीय टीमचे माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनाही अनेकवेळा त्यांच्या कार्यकाळात टीकेचा सामना करावा लागला.

  • Share this:
    मुंबई, 12 जून : टीम इंडियाच्या (Team India) निवड समितीला (Selection Committee) चांगल्या कामगिरीचं श्रेय क्वचितच मिळतं, उलट अनेकवेळा त्यांना खेळाडूंची निवड केल्याने तसंच त्यांना डावलल्यामुळे टीका सहन करावी लागते. भारतीय टीमचे माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनाही अनेकवेळा त्यांच्या कार्यकाळात टीकेचा सामना करावा लागला, याबाबत त्यांनी आता मौन सोडलं आहे. दोन वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप दरम्यान अनुष्का शर्मासोबत (Anushka Sharma) झालेल्या एका घटनेबाबत एमएसके प्रसाद बोलले. त्या घटनेनंतर एमएसके प्रसाद यांच्यावर माजी क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी जोरदार टीका केली होती. एमएसके प्रसाद 2016 ते 2020 या कालावधीमध्ये टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष होते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017, वर्ल्ड कप 2019 आणि 2018-19 ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वात टीमची निवड करण्यात आली. या स्पर्धांसाठी निवड झालेल्या खेळाडूंबाबत अनेक वादही निर्माण झाले. 2019 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मावरूनही निवड समितीवर निशाणा साधण्यात आला. वर्ल्ड कपदरम्यान निवड समितीच्या सदस्याने अनुष्का शर्माला कॉफी नेऊन दिली, असा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनियर (Farokh Engineer) यांनी एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीवर टीका केली होती. आमच्याकडे मिकी माऊस निवड समिती आहे. या खेळाडूंना 12 टेस्ट खेळण्याचाही अनुभव नाही, असं फारुख इंजिनियर म्हणाले होते. वर्ल्ड कपमध्ये घडलेल्या या घटनेबाबत एमएसके प्रसाद इएसपीएन क्रिकइन्फोशी सविस्तर बोलले. 'निवड समितीला कॉफी देण्याच्या प्रकरणात जबरदस्ती ओढण्यात आलं. पण जेव्हा स्टार खेळाडूंच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायदेशात हरवण्यात आलं, तेव्हा कोणीही निवड समितीचं कौतुक केलं नाही. आम्हाला त्यामुळे काहीही फरक पडला नाही, कारण टीम मॅनेजमेंटने आमचं काम समजून घेतलं आणि आमचं कौतुक केलं. आमच्यासाठी हेच समाधानकारक आहे. बाहेरच्या माणसांनी काहीही बोलावं, पण टीमशी जोडल्या गेलेल्यांना माहिती आहे, आम्ही काय केलं ते. खासकरून टीमचे बॉलिंग कोच भरत अरूण आणि पारस म्हाम्ब्रे यांना याबाबत माहिती आहे,' असं एमएसके प्रसाद म्हणाले. 'युवा खेळाडूंना शोधण्यासाठी आम्ही नवीन ढाचा तयार केला. पहिले बॉलर आपलं डोकं आणि चुकांमधून शिकायचा, पण आता सगळ्या गोष्टी ठरल्या आहेत. एक ट्रेनिंग प्रोग्राम तयार झाला आहे. कोणत्या लाईन आणि लेन्थवर बॉलिंग करायची, त्यांच्या बॉलिंगमध्ये कमतरता काय आहे, मोठ्या बॅट्समनना आऊट कसं करायचं आणि यासाठी फिट राहणं कसं गरजेचं आहे, हे सगळं बॉलरना सांगितलं जातं,' अशी प्रतिक्रिया एमएसके प्रसाद यांनी दिली. 'बॉलर्सच्या फिटनेसवर आम्ही सुरुवातीपासूनच काम करत आहोत. ज्याचे निकाल आता तुमच्यासमोर येत आहेत. पहिले बॉलर दोन टेस्टनंतर दुखापतग्रस्त व्हायचे, पण आता तसं होत नाही. यामध्ये बोर्ड, निवड समिती आणि ट्रेनिंगशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींची भूमिका महत्त्वाची आहे,' असं वक्तव्य प्रसाद यांनी केलं.
    Published by:Shreyas
    First published: