Home /News /sport /

आई-वडिलांच्या कोरोना इलाजासाठी क्रिकेटरकडे नव्हते पैसे; ज्वाला गुट्टाने केली मदत

आई-वडिलांच्या कोरोना इलाजासाठी क्रिकेटरकडे नव्हते पैसे; ज्वाला गुट्टाने केली मदत

वेदा कृष्णमूर्ती (Veda Krishnamurthy) हिने तर कोरोनामुळे आई आणि बहिण गमावली आहे. यानंतर आता आणखी एका महिला क्रिकेटपटूच्या आई-वडिलांना कोरोना झाला आहे.

  मुंबई, 17 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातलं आहे. देशभरात दिवसाला कोरोनाचे 4 लाखांच्या घरात रुग्ण आढळत आहेत, तसंच हजारो लोकांचा दरदिवशी मृत्यू होत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे हॉस्पिटल्स आणि ऑक्सिजन बेड्सची कमतरता जाणवू लागली आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या वर्षाची आयपीएल स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली. वरुण चक्रवर्ती, संदीप वॉरियर, अमित मिश्रा, वृद्दीमान सहा, मायकल हसी, एल बालाजी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच आर.अश्विन याच्या घरातल्या 10 सदस्यांना कोरोना झाल्यामुळे त्यानेही आयपीएल अर्ध्यातच सोडली. टीम इंडियाचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल याच्या आई-वडिलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. टीम इंडियाची क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती (Veda Krishnamurthy) हिने तर कोरोनामुळे आई आणि बहिण गमावली आहे. यानंतर आता आणखी एका महिला क्रिकेटपटूच्या आई-वडिलांना कोरोना झाला आहे. टीम इंडियाची माजी क्रिकेटपटू सरावंती नायडू (Sravanthi Naidu) हिचे आई-वडिल कोरोनामुळे रुग्णालयात आहेत. बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने सरावंती नायडूसाठी तेलंगणा सरकारकडे मदत मागीतली आहे.

  क्रिकेटमध्ये नवं चक्रीवादळ, वॉनच्या 'मॅच फिक्सर' वक्तव्यावर सलमान बटचा पलटवार

  'भारताची आणि हैदराबादची माजी ऑलराऊंडर सरावंती नायडूच्या आई-वडिलांचा कोरोनाशी संघर्ष सुरू आहे. तिने आत्तापर्यंत 16 लाख रुपये खर्च केला आहे. आणखी खर्चासाठी तिला मदतीची गरज आहे, त्यामुळे तुम्ही मदत करा,' असं ट्वीट ज्वाला गुट्टाने केलं आहे. या ट्वीटमध्ये तिने टीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटीआर यांनाही टॅग केलं आहे. टीम इंडियाची क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीच्या आई आणि बहिणीचा कोरोनामुळे मृत्यू झाला, पण बीसीसीआयने (BCCI) वेदाची साधी चौकशीही केली नाही, असा आरोप ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू लिसा स्थळेकरने (Lisa Sthalekar) केला. IPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO याबाबत लिसाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली. इंग्लंड दौऱ्यासाठी वेदाची निवड न करण्याचा निर्णय योग्य होता, पण कठीण प्रसंगात बीसीसीआयने तिच्यासोबत बोलायला हवं होतं, असं लिसा म्हणाली.
  First published:

  Tags: Corona, Cricket

  पुढील बातम्या