Home /News /sport /

श्रीलंकेकडून 9 वर्ष क्रिकेट खेळणारा 'हा' माजी दिग्गज क्रिकेटर बसला उपोषणाला, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

श्रीलंकेकडून 9 वर्ष क्रिकेट खेळणारा 'हा' माजी दिग्गज क्रिकेटर बसला उपोषणाला, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

श्रीलंकेवर अर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे देशातील नागरीकांना अनेक संकटांना सामोरे जावं लागत आहे. महगाईमुळे त्रस्त झालेलं नागरिक उपोषणाला बसत आहेत. अशातच, माजी दिग्गज क्रिकेटरही (Dhammika Prasad ) रस्त्यावर उतरला आहे.

    नवी दिल्ली, 15 एप्रिल: भारताचा शेजारील देश म्हणजे श्रीलंका(Sri Lanka Crisis). सध्या या देशात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. श्रीलंकेवर अर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे देशातील नागरीकांना अनेक संकटांना सामोरे जावं लागत आहे. महगाईमुळे त्रस्त झालेलं नागरिक उपोषणाला बसत आहेत. अशातच, माजी दिग्गज क्रिकेटरही (Dhammika Prasad ) रस्त्यावर उतरला आहे. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू धम्मिका प्रसाद(Dhammika Prasad) याने आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या आणि इस्टर डेच्या दहशतवादी हल्ल्याचा बळी पडलेल्या बेट राष्ट्रातील लोकांना न्याय मिळावा, या मागणीसाठी शुक्रवारी 24 तासांचे उपोषण सुरू केले. 2019 च्या इस्टर संडे बॉम्बस्फोटातील पीडितांना न्याय मिळावा या मागणीसाठी प्रसाद आंदोलन करत आहेत. 'मला बॉम्बस्फोटातील सर्व निष्पाप बळींना न्याय मिळवून द्यायचा आहे.' असे विधान प्रसादने माध्यामांशी बोलताना केले. महागाई गगनाला भिडली देशभरात वीजपुरवठा खंडित झाला आहे. विजेअभावी रुग्णांच्या आवश्यक शस्त्रक्रियाही रुग्णालयात होत नाहीत, कारखाने बंद, पेपर कमी असल्याने परीक्षा रद्द, रेल्वे-बसची वाहतूक ठप्प झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तेलाचा अभाव.. पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडली आहे, घरातील चुल बंद झाल्या आहेत आणि खाण्यापिण्याच्या तुटवड्यामुळे दुकानांमध्ये लूट सुरू झाली आहे. 3 वर्षापूर्वी आत्मघातकी हल्ला या आत्मघातकी हल्ल्यात सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याने चौथ्या हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला नव्हता. मात्र नंतर दुसऱ्या ठिकाणी त्याने स्फोटकांच्या मदतीने स्वत:ला उडवले. या हल्ल्यात त्याच्यासह चर्चमधील पर्यटक आणि हॉटेलमध्ये नाश्ता करत असलेल्या नागरिकांचा बळी गेला. इस्लामिक स्टेटशी संलग्न असलेल्या दोन स्थानिक मुस्लिम गटांना या हल्ल्यांसाठी जबाबदार धरण्यात आले. अर्थिक संकटाला राजपक्षे जबाबदार श्रीलंकेत तांदळाचे दर 250 रुपये किलो, गहू 200 रुपये किलो, साखर 250 रुपये किलो, खोबरेल तेल 900 रुपये आणि दूध पावडर 200 रुपये किलो दराने विकली जात आहे. 2000 प्रति किलो. देशाच्या या स्थितीसाठी लोक फक्त श्रीलंकेच्या राजपक्षे सरकारला जबाबदार मानत आहेत. विशेषत: लोक श्रीलंका सरकारची घराणेशाही जबाबदार मानत आहेत. कारण श्रीलंका सरकारचे पाच मोठे चेहरे राजपक्षे कुटुंबातील आहेत. 39 वर्षीय प्रसाने 2006 ते 20015 या कालावधीत देशासाठी 25 कसोटी आणि24 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच त्याने, अनुक्रमे 75 आणि 32 विकेट घेतल्या आहेत.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Cricket news, Sports, Sri lanka

    पुढील बातम्या