माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या भावाला घातली गोळी, जागीच मृत्यू

माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या भावाला घातली गोळी, जागीच मृत्यू

गुरुवारी व्हर्नॉन ट्वीट करत या वृत्ताला दुजोरा दिला. टायरॉन फिलँडर असे व्हर्नॉनच्या धाकट्या भावाचे नाव आहे.

  • Share this:

केप टाऊन, 08 ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका संघाचा अष्टपैलू खेळाडू व्हर्नॉन फिलान्डरच्या (Vernon Philander) लहान भावाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी कुटुंब राहत असलेल्या केप टाऊनमधील रेवेनस्मेड येथे घडली. गुरुवारी व्हर्नॉन ट्वीट करत या वृत्ताला दुजोरा दिला. टायरॉन फिलँडर असे व्हर्नॉनच्या धाकट्या भावाचे नाव आहे.

व्हर्नॉननं ट्वीट करत, “माझ्या कुटुंबाला आमच्या मुळ गावी रेवेनस्मेडमध्ये निर्घृण हत्येस सामोरे जावे लागले. या कठीण काळात कुटुंबाला एकांत द्यावा, आणि कुटुंबाचा आदर करावा अशी विनंती मी करतो”, अशी विनंती चाहत्यांना आणि माध्यमांना केली आहे.

तसेच व्हर्नॉननं, “हा हत्येचा पोलीस तपास करत आहेत. आम्ही मीडियाला विनंती करतो की त्यांनी पोलिसांना त्यांच्या परीनं चौकशी करू द्यावी. सद्यस्थितीत आम्हाला याबाबत काही माहिती नाही आहे. हा आमच्यासाठी कठीण काळ आहे. टायरॉन कायम आमच्या हृदयात आहे. त्याच्या आत्म्याला शांती मिळो”, असे ट्वीट केले आहे.

आफ्रिकन न्यूज एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार, पाण्याची ट्रॉली घेऊन जात असताना टायरॉनला गोळी घालण्यात आली. टायरॉनला मृतदेह बराच वेळ रस्त्यावर पडला होता. टायरॉनला पाहण्याची त्याची आई बोनिता बाहेर आल्यानंतर त्यांनी टायरॉनला पाहिलं. लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र टायरॉनचा जागीच मृत्यू झाला होता.

व्हर्नॉन फिलान्डर हा दक्षिण आफ्रिकेचा यशस्वी अष्टपैलू खेळाडू होता. व्हर्नॉननं 64 कसोटी सामन्यात 1,779 धावा तर 224 विकेट घेतल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 30 सामने खेळत 151 धावा आणि 41 विकेट घेतल्या आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: October 8, 2020, 4:13 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या