मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचे निधन, क्रिकेट जगतावर पसरली शोककळा

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरचे निधन, क्रिकेट जगतावर पसरली शोककळा

Aftab Baloch

Aftab Baloch

पाकिस्तानचे माजी क्रिकेटर आफताब बलोच (Aftab Baloch) यांचे निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. त्यांची एका डावात 428 धावांची खेळी पाकिस्तानच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गाजली होती.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 25 जानेवारी: पाकिस्तानचे माजी क्रिकेटर आफताब बलोच (Aftab Baloch) यांचे निधन झाले. ते 68  वर्षांचे होते. त्यांची एका डावात 428 धावांची खेळी पाकिस्तानच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गाजली होती. त्यांची हिच ओळख क्रिकेट जगतात निर्माण झाली आहे.

बलोच यांनी 1973 - 74 मध्ये कराचीत सिंध प्रांतकडून खेळताना बलोचिस्तान विरूद्ध 428 धावांची खेळी केली होती.सिंधने आपला डाव 951 धावांवर घोषित केला होता. त्यावेळी त्यांनी जावेद मियांदादबरोबर पाचव्या विकेटसाठी 174 धावांची भागीदारी केली होती.

मात्र त्यांना पाकिस्तानकडून (Pakistan Cricket Team) अधिक खेळण्याची संधी मिळाली नाही. ते पाकिस्तानकडून केवळ 2 कसोटी सामने खेळले. त्यांनी 16 व्या वर्षी 1969 मध्ये न्यूझीलंडविरूद्ध कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांना 25 धावाच करता आल्या होत्या. त्यानंतर 6 वर्षांनी त्यांनी वेस्ट इंडीज बरोबर आपला दुसरा कसोटी सामना खेळला. त्यावेळी त्यांनी 12 आणि नाबाद 60 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्यांना पाकिस्तान संघात कधी संधी मिळाली नाही.

बलोच यांचे वडील शमशेर बलोच महाराष्ट्राकडून खेळले होते रणीजी ट्रॉफी

आफताब बलोच यांचे वडील शमशेर बलोच हे फाळणीच्या आधी गुजराज आणि महाराष्ट्राकडून (Maharashtra) रणीजी ट्रॉफी (Ranji Trophy) खेळायचे. 16 व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या आफताब बलोच यांनी 172 प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. त्यात 9 हजार 171 धावा आणि 223 विकेट घेतल्या होत्या. त्यांनी 20 शतक आणि 45 अर्धशतके ठोकली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) चेअरमन रमीझ राजा यांनी बलोच यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. रमीझ राजा ज्यावेळी लहानाचे मोठे होत होते त्यावेळी बलोच हे एक लोकप्रिय क्रिकेटर होते.

First published:

Tags: Pakisatan, Pakistan Cricket Board