Home /News /sport /

पाकिस्तानच्या अब्दुल रझाकचं महिला क्रिकेटपटूविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, VIDEO

पाकिस्तानच्या अब्दुल रझाकचं महिला क्रिकेटपटूविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, VIDEO

पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर अब्दुल रझाक (Abdul Razzaq) याच्यावर महिला विरोधी टिप्पणी केल्यामुळे चौफेर टीकेला सामोरं जावं लागत आहे. रझाकने आपल्या देशाची महिला क्रिकेटपटू निदा डारसमोरच (Nida Dar) हे वादग्रस्त वक्तव्य केलं.

    मुंबई, 16 जुलै : पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर अब्दुल रझाक (Abdul Razzaq) याच्यावर महिला विरोधी टिप्पणी केल्यामुळे चौफेर टीकेला सामोरं जावं लागत आहे. रझाकने आपल्या देशाची महिला क्रिकेटपटू निदा डारसमोरच (Nida Dar) हे वादग्रस्त वक्तव्य केलं. एवढच नाही तर त्याने निदाच्या हेयरस्टाईलवरही कमेंट केली, यानंतर सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोकांनी त्याची शाळा घेतली. 343 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या रझाकला लोकांनी सोशल मीडियावर चांगलंच सुनावलं. पाकिस्तानमधल्या नियो न्यूजवर एका शोसाठी रझाक आणि निदा यांना बोलावण्यात आलं होतं. या शोमध्ये खेळात महिलांच्या सहभागाबाबत चर्चा सुरू होती. निदा महिलांची बाजू मांडत होती. या खेळाबद्दल आपल्याला किती वेड आहे, हे निदा सांगत होती. यानंतर रझाकनेही त्याचं मत मांडलं, पण हे मत मांडताना त्याचा तोल ढासळला. razzaq comment on nida 'हे क्षेत्रच असं आहे. जेव्हा या मुली क्रिकेटपटू बनतात तेव्हा त्यांना पुरुषांपेक्षा चांगलं नाही, तर पुरुषांची बरोबरी करायची असते. फक्त पुरुषच नाही, तर महिलाही असं करू शकतात, असं त्यांना सिद्ध करायचं असतं. काही काळानंतर त्यांची लग्न करण्याची इच्छाही निघून जाते. तुम्ही यांच्याशी हस्तांदोलन केल तर मुलीसारख्या नाही वाटणार, यांची हेयरस्टाईल बघा,' असं वादग्रस्त वक्तव्य अब्दुल रझाकने केलं. निदाची बॉयकट हेयरस्टाईल आहे. रझाकच्या या वक्तव्यामुळे वाद वाढला. निदानेही रझाकला समजवण्याचा प्रयत्न केला. 'आम्हाला जिमला जावं लागतं, आपला पेशाच तसा आहे. आम्हाला बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगही करावी लागते आणि याचा सरावही करावा लागतो,' असं निदा म्हणाली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Pakistan

    पुढील बातम्या