मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

कोरोनामुळे आणखी एका क्रिकेटपटूचा मृत्यू, 10 दिवसांपूर्वी वडिलांचं निधन

कोरोनामुळे आणखी एका क्रिकेटपटूचा मृत्यू, 10 दिवसांपूर्वी वडिलांचं निधन

कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलेलं असतानाच, एका क्रिकेटपटूचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ओडिशा क्रिकेट टीमचे माजी कर्णधार प्रशांत मोहपात्रा (Prashant Mohapatra) यांचा बुधवारी निधन झालं

  • Published by:  Shreyas

मुंबई, 19 मे : ओडिशा क्रिकेट टीमचे माजी कर्णधार प्रशांत मोहपात्रा (Prashant Mohapatra) यांचा बुधवारी कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) मृत्यू झाला आहे. एम्स भुवनेश्वरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 47 वर्षांच्या प्रशांत मोहपात्रा यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, पण सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली, असं एम्स भुवनेश्वरचे अधिक्षक डॉ.एस.एन मोहंती यांनी सांगितलं. प्रशांत यांचे वडील आणि राज्यसभा खासदार रघुनाथ मोहपात्रा (Raghunath Mohapatra) यांचं 10 मे रोजी कोरोनामुळे निधन झालं होतं. तसंच प्रशांत यांचा भाऊ जसबंत यांच्यावरही याच रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू आहेत.

1 सप्टेंबर 1973 साली जन्मलेले प्रशांत मोहपात्रा बॅट्समन होतं. 1990 साली त्यांनी बिहारविरुद्ध रणजी ट्रॉफीत पदार्पण केलं. तर दुलीप आणि देवधर ट्रॉफीमध्ये ते इस्ट झोनकडून खेळायचे. प्रशांत यांनी 45 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 30.08 च्या सरासरीने 2,196 रन केले, यामध्ये 5 शतकं आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. निवृत्ती घेतल्यानंतर प्रशांत यांची बीसीसीआयने मॅच रेफ्री म्हणून नियुक्ती केली होती.

प्रशांत यांचे वडील आणि राज्यसभा खासदार रघुनाथ मोहपात्रा यांचं 9 मे रोजी कोरोनामुळेच निधन झालं. रघुनाथ यांचा जन्म पुरीमध्ये झाला होता. 1976 साली त्यांना पद्मश्री, 2001 साली पद्म भूषण आणि 2013 साली पद्म विभूषण म्हणून गौरवण्यात आलं.

First published:

Tags: Coronavirus, Cricket