Home /News /sport /

'हो मी Gay आहे...' माजी किवी खेळाडूचा मोठा खुलासा

'हो मी Gay आहे...' माजी किवी खेळाडूचा मोठा खुलासा

'हो मी Gay आहे...' माजी किवी खेळाडूचा मोठा खुलासा

'हो मी Gay आहे...' माजी किवी खेळाडूचा मोठा खुलासा

Heath Davis - 2011 साली स्टीव्ह डेव्हिस या इंग्लिश क्रिकेटरनं सर्वात प्रथम तो समलैंगिक असल्याची बाब उघड केली होती. सार्वजनिकरित्या असं समलैंगिक नातेंसंबंध मान्य करणारा तो पहिलाच क्रिकेटर ठरला होता. पण आता न्यूझीलंडच्या एका माजी क्रिकेटरचं नाव या यादीत जोडलं गेलंय.

पुढे वाचा ...
    मुंबई 02 ऑगस्ट : क्रीडाविश्वात आजपर्यंत पुरुष खेळाडूंकडून समलैंगिक नातेसंबंधांबाबत फार कमी बोललं गेलंय. क्रिकेटमध्येही अशी फार कमी उदाहरणं आहेत. काही महिला खेळाडूंच्या अशा नातेसंबंधांबाबतच्या चर्चा मात्र झाल्या. त्यांनी ते स्वीकारलही. पण पुरुष खेळाडूंच्या बाबतीत अशी उदाहरणं क्वचितच पाहायला मिळाली. 2011 साली स्टीव्ह डेव्हिस या इंग्लिश क्रिकेटरनं सर्वात प्रथम तो समलैंगिक असल्याची बाब उघड केली होती. सार्वजनिकरित्या असं समलैंगिक नातेंसंबंध मान्य करणारा तो पहिलाच क्रिकेटर ठरला होता. पण आता न्यूझीलंडच्या एका माजी क्रिकेटरचं नाव या यादीत जोडलं गेलंय. त्याचं नाव आहे हीथ डेव्हिस. 50 वर्षांचे हीथ डेव्हिस सध्या ऑस्ट्रेलियात राहतात. डेव्हिस यांनी नुकतीच स्पिन ऑफ या ऑनलाईन मॅगझिनला मुलाखत दिली. त्याच मुलाखतीत त्यांनी ते ‘गे’ असल्याचं जाहीररित्या मान्य केलं. “मला वाटतं हा माझ्या आयुष्याचा भाग आहे आणि मी ते आजपर्यंत लपवत होतो. यात बऱ्याच गोष्टी होत्या ज्या मी इतरांपासून वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. मी एकटा होतो. त्यामुळे हे सगळं कुणाशी बोलू शकत नव्हतो. पण ऑकलंडमध्ये आणि माझ्या संघातल्या प्रत्येकालाही ही बाब माहित होती. आणि त्यांनाही मी ‘गे’ असणं ही बाब फार मोठी वाटत नव्हती. त्यामुळे 1997 साली जेव्हा मी ऑकलंडमध्ये आलो तेव्हापासून मला मोकळं आयुष्य जगता आलं.”हीथ डेव्हिस यांनी 1994 ते 1997 या काळात न्यूझीलंडकडून 5 कसोटी आणि 11 वन डे सामने खेळले आहेत. याशिवाय स्थानिक क्रिकेटमध्येही त्यांनी चांगली कामगिरी बजावली होती. हेही वाचा - Asia Cup महिन्याभरात, तारीख-ठिकाणाची घोषणा, या दिवशी होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला! आता हीथ डेव्हिस हे समलैंगिक नातेसंबंधांचा स्वीकार करणारे केवळ दुसरेच क्रिकेटर असले तरी महिला क्रिकेटमध्ये ही यादी मात्र मोठी आहे. क्रिकेटमधील लेडी कपल्स सध्या दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाची कर्णधार डेन व्हॅन निकर्क आणि मरिझान काप, न्यूझीलंडची ली तहूहू आणि अमी सदरवेट, ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मेगन शूट आणि जेस हॉलिहोक, ऑस्ट्रेलियाचीच जेस जोनासन आणि सारा वेन, इंग्लंडची कर्णधार नताली शीवर आणि कॅथरीन ब्रंट अशी ही यादी बरीच मोठी आहे.
    Published by:Siddhesh Kanase
    First published:

    Tags: Cricket, Cricket news

    पुढील बातम्या