भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन

भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन

आरपी सिंगच्या (RP Singh) वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरपी सिंगने या प्रकरणाची माहिती ट्विट करून दिली आहे. त्यांचे वडील शिवप्रसाद सिंग हे बर्‍याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर लखनऊच्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 मे : भारताचा माजी फास्ट बॉलर आणि 2007 सालच्या टी-20 वर्ल्ड कप (T-20 World cup 2007) विजेत्या टीममधील खेळाडू आरपी सिंगच्या (RP Singh) वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरपी सिंगने या प्रकरणाची माहिती ट्विट करून दिली आहे. त्यांचे वडील शिवप्रसाद सिंग हे बर्‍याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर लखनऊच्या मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते.

फार मोठ्या दुःखानं सांगावं लागत आहे की, माझे वडील शिवप्रसाद सिंग यांचं निधन झालं आहे. माझ्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यामुळं त्यांचा 12 मे रोजी मृत्यू झाला, ते आम्हा सर्वांना सोडून गेले आहेत. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा. ओम शांती, असे ट्विट आरपी सिंगने केलं आहे.

कोरोनामुळे देशात विदारक स्थिती निर्माण झाली आहे. सध्या काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृतांचा आकडा मात्र वाढतच आहे. कोरोनाचा क्रिकेटवरही परिणाम झाला आहे. खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने आयपीएल स्पर्धा (IPL 2021) मध्येच थांबवावी लागली. बऱ्याच क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतीय क्रिकेट टीमचा अनुभवी लेगस्पिनर पियूष चावलाचे वडील प्रमोद कुमार चावला यांचे या आजारामुळे दोन दिवसांपूर्वीच निधन झाले होते. पियूष चावलाचे वडील गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल होते.

हे वाचा - भुवनेश्वर कुमारची इंग्लंड दौऱ्यासाठी का झाली नाही निवड? कारण आलं समोर…

तत्पूर्वी, आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा फास्ट बॉलर चेतन साकारिया याच्या वडिलांचेही रविवारी कोविड-19 मुळे निधन झाले होते. अलीकडेच त्याचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वीच साकरियाच्या भावाने आत्महत्या केली होती. चेतनने गेल्या 5 महिन्यांत आपल्या घरातील दोन सदस्यांना गमावलं आहे.

हे वाचा - बापरे! कोरोनापासून बचावासाठी हे लोक करताहेत गोमूत्र, शेणाने अंघोळ; डॉक्टरांनी केलं Alert

आरपी सिंगने 2005 मध्ये वनडे क्रिकेट आणि 2006 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. जवळपास सहा वर्षे तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. तो गेल्या काही काळापासून क्रिकेट तज्ज्ञ म्हणून काम करत आहे. आरपी सिंगने क्रिकेटच्या तीनही स्वरुपात 82 सामने खेळले असून १०० हून अधिक बळी घेतले आहेत. 2007 मध्ये भारत चॅम्पियन होण्यामध्ये आरपी सिंगचा मोलाचा वाटा होता, त्यानं 7 सामन्यांत 12 बळी घेतले होते.

Published by: News18 Desk
First published: May 12, 2021, 6:43 PM IST

ताज्या बातम्या