भारताच्या आक्रमक क्रिकेटरची आर्थिक अडचणींना कंटाळून आत्महत्या

भारताच्या आक्रमक क्रिकेटरची आर्थिक अडचणींना कंटाळून आत्महत्या

सतत येणाऱ्या आर्थिक अडचणींना कंटाळून आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली.

  • Share this:

चेन्नई, 16 ऑगस्ट : सध्या क्रिकेट हा एक असा खेळ आहे, जिथे पैशांची अजिबात कमतरता नाही. मात्र, हीच गोष्ट माजी क्रिकेटपटूंना लागू होत नाही. याच कारणामुळं भारताच्या एका माजी फलंजानं आत्महत्या केली आहे. सतत येणाऱ्या आर्थिक अडचणींना कंटाळून आपल्या राहत्या घरात या माजी खेळाडूनं प्राण सोडले.

भारताचा माजी आक्रमक फलंदाज व्हीबी चंद्रशेखर यांनी चेन्नई येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. माईलापोर येथील घरात त्यांना गळफास लावून आत्महत्या केली. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आत्महत्या केली असून अनेक काळापासून असलेल्या आर्थिक अडचणींमुळं त्यानं आपले जीवन संपवावे लागले. चंद्रशेखर यांनी भारतासाठी सात एकदिवसीय सामने आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सहभाग घेतला होता. त्यांनी 43.09च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. चंद्रशेखर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा त्यांचा परिवार आहे.

1988मध्ये तामिळनाडूला रणजी करंडकाचे विजेतेपद मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. नंतर प्रशिक्षणाकडे आणि समालोचनाकडे वळलेल्या चंद्रशेखर यांनी बराच काळ राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये पहिली तीन वर्षे त्यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापकाची भूमिका निभावली होती.

क्रिकेट विश्वास खळबळ, सचिननं वाहिली आदरांजली

व्हीबी चंद्रशेखर यांच्या आत्महत्येमुळं क्रिकेट क्षेत्रात खळबळ माजली. सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, हरभजन सिंग, सुरेश रैना यांनी, ही वेळ नव्हती व्हिबी असे ट्वीट केले. तसेच बीसीसीआयनं आपल्या अधिकृत ट्विटरवरून व्हीबी यांच्या आत्महत्येवर दु:ख व्यक्त केले. तसेच त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, असे ट्वीट केले.

धोनीला चेन्नईमध्ये सामील करण्याचे काम चंद्रशेखर यांनी केले

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघात आणण्याचे श्रेय चंद्रशेखर यांना जाते. तसेच ते सध्या सुरू असलेल्या तमिळनाडु प्रिमियर लीगमध्ये ऑफिशिअल ब्रॉडकास्टर म्हणून काम केले.

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी, जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricketipl
First Published: Aug 16, 2019 01:10 PM IST

ताज्या बातम्या