मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /2003 वर्ल्ड कप खेळलेल्या गांगुलीच्या 'लकी' खेळाडूचा भाजपमध्ये प्रवेश

2003 वर्ल्ड कप खेळलेल्या गांगुलीच्या 'लकी' खेळाडूचा भाजपमध्ये प्रवेश

भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया (Dinesh Mongia) याने मंगळवारी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार दिनेश मोंगियाने दिल्लीमध्ये भाजपचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारलं.

भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया (Dinesh Mongia) याने मंगळवारी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार दिनेश मोंगियाने दिल्लीमध्ये भाजपचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारलं.

भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया (Dinesh Mongia) याने मंगळवारी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार दिनेश मोंगियाने दिल्लीमध्ये भाजपचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारलं.

नवी दिल्ली, 28 डिसेंबर : भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया (Dinesh Mongia) याने मंगळवारी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार दिनेश मोंगियाने दिल्लीमध्ये भाजपचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारलं. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दिनेश मोगिंया भाजपमध्ये आल्यानंतर तो पंजाब निवडणुकीत तो सक्रीय भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. दिनेश मोंगियासोबत फतह जंग बाजवा, हरगोविंद लाधी, कमल बक्सी, मधुमीत आणि राजदेव भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

दिनेश मोंगियाने सप्टेंबर 2019 साली क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. बऱ्याच काळापासून तो टीमच्या बाहेर होता. 2007 साली बांगलादेशविरुद्ध दिनेश मोंगिया त्याची अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला होता. यानंतर त्याला टीममध्ये स्थान मिळालं नाही. मोंगियाने 2001 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

दिनेश मोंगियाने 2007 साली बीसीसीआयने बंदी घातलेल्या आयसीएलमध्ये सहभाग घेतला, यानंतर त्याच्यावरही बंदी घालण्यात आली. दिनेश मोंगिया 2003 सालच्या भारताच्या वर्ल्ड कप टीममध्येही होता. या स्पर्धेच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. तेव्हाचा कर्णधार सौरव गांगुली याच्यासाठी दिनेश मोंगिया लकी असल्याचंही बोललं जायचं. दिनेश मोंगियाची आंतरराष्ट्रीय कारकिर्द जवळपास 5 वर्षांची होती, पण या काळातही तो टीम इंडियात नेहमी नसायचा.

दिनेश मोंगियाने वनडेमध्ये 57 मॅच खेळून 27.95 च्या सरासरीने 1230 रन केल्या, याशिवाय त्याने 14 विकेटही घेतल्या. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात दिनेश मोंगियाने 159 रन केले होते, ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. तसंच हे त्यांचं आंतरराष्ट्रीय करियरमधलं एकमेव शतक होतं. मोंगियाने त्याची एकमेव आंतरराष्ट्रीय टी-20 दक्षिण आफ्रिकेत खेळली. ही भारताचीही पहिलीच आंतरराष्ट्रीय टी-20 होती. या सामन्यात त्याने 38 रनची खेळी केली होती. मोंगियाने इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेटही खेळलं. तो लँकशायर आणि लिसेस्टरशर टीममध्ये होता.

दिनेश मोंगियाने करियरमध्ये एकही टेस्ट मॅच खेळली नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 121 सामन्यांमध्ये 21 शतकं केली. मोंगिया पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीमध्येही होता.

First published:
top videos

    Tags: BJP, Team india