Home /News /sport /

युवी पुन्हा क्रिकेटचं मैदान गाजवणार? गेल्या वर्षी घेतलेल्या निवृत्तीनंतर पुन्हा परतीचे संकेत

युवी पुन्हा क्रिकेटचं मैदान गाजवणार? गेल्या वर्षी घेतलेल्या निवृत्तीनंतर पुन्हा परतीचे संकेत

युवराज सिंहला मैदानात षटकार मारताना पाहणं हा मोठा आनंद असतो

    नवी दिल्ली, 9 सप्टेंबर : भारतीय संघाचे माजी खेळाडू युवराज सिंह आपली निवृत्ती परत घेऊ इच्छित आहेत. आणि यासाठी त्यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना पत्र लिहिले आहे. ते पुन्हा देशांतर्गत क्रिकेटच्या येत्या सत्रात पंजाबसाठी खेळू शकतात. युवीने बुधवारी क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. युवराज सिंहने गेल्या वर्षी 10 जून रोजी क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून संन्यास घेतला होता. क्रिकेटमध्ये परतण्याच्या योजनेवर 38 वर्षीय युवराज म्हणाला, मी शुभमन गिल, प्रभसिमरन सिंह, हरप्रीत बरार यांसराख्या पंजाबच्या युवा क्रिकेटरांसोबत मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये काही वेळ घालवला आणि मला खूप मजा आली. हे ही वाचा-IPL 2020, MI Schedule: कधी, कोणत्या टीमला टक्कर देणार रोहितची मुंबई इंडियन्स मी त्यांच्यासोबत खेळाच्या विविध पैलूंबाबत चर्चा केली. यावेळी मी अनुभवले की मी त्यांना जे काही सांगत होतो, ते त्यांना कळत होते. युवी पुढे म्हणाला की, त्या खेळाडूंना खेळाबाबत काही आणखी महत्त्वाचे पैलू सांगण्यासाठी मला नेटवर जावे लागले. तेथे मी ज्या प्रकारे बॉलला हिट केले मलाच याचं आश्चर्य वाटलं. खरं पाहता मी बराच काळ खेळलो नाहीये. हे ही वाचा-फक्त 27 चेंडूत संपला सामना, मोडला मुंबई इंडियन्सचा 12 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड पंजाब क्रिकेट संघाने भारताचे माजी ऑलराउंडर युवराज सिंहच्या संन्यासाचा निर्णय परत घेत प्रदेशातील टीममधील खेळाडू आणि मेंटर होण्याचा आग्रह केला होता. पीसीए सचिव पुनीत बाली यांनी सांगितले की त्यांनी युवराजकडे याबाबत आग्रह केला आहे. युवराजने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविला केलं होते. त्यानंतर युवरात गेल्या वर्षी परदेशी लीगमध्ये सहभागी झाला होता. ज्यामध्ये ग्लोबल टी-20 कॅनडा आणि अबुधाबी टी-10 लीग सामील आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Cricket, Yuvraj singh

    पुढील बातम्या