Elec-widget

दिग्गज खेळाडूचा मोठा गौप्यस्फोट, क्रिकेटमध्ये लालची लोकांची कमी नाही

दिग्गज खेळाडूचा मोठा गौप्यस्फोट, क्रिकेटमध्ये लालची लोकांची कमी नाही

टीएनपीएलमध्ये भ्रष्टाचार आणि मॅच फिक्सिंगचं प्रकरण समोर आल्यानंतर आता भारताच्या दिग्गज खेळाडूने मोठा गौप्यस्फोट केला आहे.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : गेल्या आठवड्यात टीएनपीएलमध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न झाल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. मॅच फिक्सिंगची ही कीड महिला क्रिकेटपर्यंतही पोहचली असल्याचं यावेळी समोर आलं होतं. आता भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी म्हटलं की, क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग पूर्णपणे रोखता येणार नाही. फिक्सिंगच्या मुळात पैशांची हाव आहे. यावर कोणताही उपाय नाही.

एका मुलाखतीत गावस्कर यांनी सांगितलं की, कोणत्याही गोष्टीचा मोह हा असा आजार आहे ज्याला मार्गदर्शन, तत्व किंवा इतर उपायांनी रोखता येत नाही. हे स्वाभाविक आहे. पांढरपेशा लोकांमध्येही ही बाब असते. क्रिकेटमध्ये अशा लालची लोकांची कमी नाही असा गौप्यस्फोटही गावस्कर यांनी केला.

देशात सुरू असलेल्या क्रिकेट लीग चांगल्या आहेत. यातून प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळते. सध्या टीव्हीचा काळ आहे आणि सगळीकडं लक्ष असतं. तुम्ही काही चुकीचं करता तेव्हा लगेच तुमच्याकडं बोट दाखवलं जातं असंही गावस्कर म्हणाले.

तमिळनाडू प्रिमिअर लीगमध्ये लागलेल्या फिक्सिंगच्या आरोपानंतर क्रिकेट हा खरच जेंटलमन गेम आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 2013मध्ये आयपीएलमध्ये झालेल्या फिक्सिंगनं भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ माजली. दरम्यान आता पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये फिक्सिंगचे वारे शिरले आहे.

मॅच फिक्सिंग प्रकरणात युवा खेळाडू असल्याची धक्कादायक माहिती एसीयुनं दिली आहे. या खेळाडूची शिफारस एका दिग्गज क्रिकेटपटूनं केली होती. तसेच त्याच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक मदतही संघ मालकांनी त्याला केली होती अशी माहिती समजते. अद्याप कोणाचीही नावे समोर आलेली नाहीत.

Loading...

भरमैदानात चाहतीनं काढली ऋषभ पंतची विकेट, सर्वांसमोर म्हणाली I Love You!

सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या दिग्गज खेळाडूवर आता नियम तोडल्यामुळं झाली शिक्षा

कॅप्टन कोहली मैदानावरचा राडा पडला महागात, ICCने केली मोठी कारवाई

VIDEO : हेल्मेट घालून केली चोरी; विदेशी दारूसह 50000 लुटतानाची दृश्य CCTV मध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 24, 2019 08:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...