मतदान नाही करणार राहुल द्रविड, जाणून घ्या काय आहे कारण...

मतदान नाही करणार राहुल द्रविड, जाणून घ्या काय आहे कारण...

मतदान जनजागृती करणाऱा द्रविडला नाही मतदानाचा अधिकार

  • Share this:

बेंगळुरू, 14 एप्रिल : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करता येणार नाही. राहुल द्रविडचे नाव मतदार यादीतून काढून टाकल्याने तो मतदान करू शकणार नाही.

2018 च्या विधानसभा निवडणुकीत द्रविड एक आयकॉन होता. त्यानंतर त्याने दुसरीकडे रहायला जाताना जुन्या मतदारसंघातील त्याचे नाव कमी करून घेतले. तो इंदिरानगरमध्ये राहत होता. त्याने नाव कमी केले पण नवीन मतदारसंघात मुदतीच्या आधी नाव नोंदणी करता आली नाही.

वाचा : World Cup : सेहवागने निवडला भारतीय संघ, कर्णधार कोण?

द्रविडच्या भावाने त्याचे नाव कमी करण्यासाठीची कागदपत्रे जमा केली. मात्र, द्रविडने त्याने नाव नवीन ठिकाणी मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठीचा अर्जच भरला नाही.

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आमचे अधिकारी गेले होते. मात्र दोनवेळा त्यांना घरात जाण्यापासून रोखले. याबाबत विचारले असते द्रविड बाहेर असल्याचे सांगितले तसेच मतदार यादीत नाव घालण्यासाठी कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही असे निवडणूक सहाय्यक उप विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाचा : गावस्करांनी IPL मधून शोधला वर्ल्डकपसाठी चौथ्या नंबरचा खेळाडू

विशेष म्हणजे राहुल द्रविडचे फोटो मतदान जनजागृतीसाठी वापरण्यात आले आहेत. मात्र, त्यालाच मतदान करता येणार नाही.

PHOTOS : IPL खेळणारे 'हे' चार खेळाडू बलात्कार प्रकरणी होते दोषी

VIDEO : अन् रणजितसिंह मोहिते पाटील पक्षच विसरले, भाजपच्या सभेत केली चूक

First published: April 14, 2019, 2:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading