मुंबई, 22 फेब्रुवारी : इंग्लंडची माजी क्रिकेटपटू सारा टेलरने बुधवारी तिची जोडीदार डायना ही प्रेग्नेंट असल्याची घोषणा केली आहे. सारा आणि डायना या दोघी मागील बऱ्याच काळापासून एकमेकांसोबत राहत आहेत. साराने तिच्या ट्विटरवर एक पोस्ट आणि काही फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
2019 मध्ये इंग्लंडची खेळाडू सारा टेलरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सारा ही फलंदाजासह यष्टिरक्षक देखील होती. तिने ट्विटरवर बातमी जाहीर करताना तिच्या जोडीदारासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.
Being a mother has always been my partner's dream. The journey hasn't been an easy one but Diana has never given up. I know she will be the best mum and I'm so happy to be a part of it x
19 weeks to go and life will be very different ! pic.twitter.com/9bvwK1Yf1e — Sarah Taylor (@Sarah_Taylor30) February 21, 2023
सारा टेलरने ट्विट केले की, “आई होणे हे माझ्या जोडीदाराचे नेहमीच स्वप्न राहिले आहे. हा प्रवास सोपा नव्हता पण डायनाने कधीही हार मानली नाही. मला माहित आहे की ती सर्वोत्कृष्ट आई असेल आणि मी तिचा भाग बनून खूप आनंदी आहे. अजून 19 आठवडयांनी आयुष्य वेगळे असेल".
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news