सचिन तेंडुलकरच्या अविस्मरणीय इनिंगचा ‘आवाज’ हरपला

सचिन तेंडुलकरच्या अविस्मरणीय इनिंगचा ‘आवाज’ हरपला

सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध 75 बॉल्समध्ये 98 रन्सची अजरामर इनिंग खेळली होती. या आक्रमक इनिंगच्या दरम्यान जॅकमन यांनी केलेली कॉमेंट्री आजही सर्वांच्या लक्षात आहे.

  • Share this:

मुंबई, 26 डिसेंबर : इंग्लंडचे माजी बॉलर (Former England) आणि प्रसिद्ध कॉमेंटेटर रॉबिन जॅकमन (Robin Jackman) यांचं निधन झालं आहे. ते 75 वर्षांचे होते. जॅकमन यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त 4 टेस्ट आणि 15 वन-डे खेळण्याची संधी मिळाली. मात्र प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये (First Class Cricket) त्यांचा मोठा दबदबा होता. 1966 ते 1982 अशी दीड दशकांहून अधिक त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेट गाजवलं. या दरम्यान त्यांनी 399 मॅचमध्ये तब्बल 1402 विकेट्स घेतल्या. ते रिटायरमेंटनंतर दक्षिण आफ्रिकेत कॉमेंटेटर बनले. त्यांची कॉमेंट्री क्रिकेट फॅन्समध्ये मोठी लोकप्रिय होती.

सचिनच्या इनिंगचा ‘आवाज’

सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताविरुद्ध  75 बॉल्समध्ये 98 रन्सची अजरामर इनिंग खेळली होती. या आक्रमक इनिंगच्या दरम्यान जॅकमन यांनी केलेली कॉमेंट्री आजही सर्वांच्या लक्षात आहे. या मॅचच्या प्रेझेंटेशनच्या दरम्यान त्यांनी सचिनचे एक अविस्मरणीय खेळी केल्याबद्दल आभार मानले होते.

“ थँक्यू सचिन... आज तुझ्यामुळे आम्हाला एक चांगली इनिंग पाहण्याची संधी मिळाली. तू आज ज्या पद्धतीनं खेळलास तसं मी संपूर्ण आयुष्यात कुणालाही खेळताना पाहिलेलं नाही,’’ या मोजक्या आणि नेमक्या शब्दात त्यांनी सचिनच्या इनिंगचं सार सांगितले होते.

ICC नं ट्विट करुन त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. ‘आम्ही महान कॉमेंट्रेटर आणि इंग्लंडचे फास्ट बॉलर रॉबिन जॅकमन यांच्या निधनाबद्दल खेद व्यक्त करतो. त्यांच्या वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. या प्रसंगी त्यांचा परिवार आणि मित्रांसोबत आमच्या संवेदना आहेत’, असं आयसीसीनं म्हंटलं आहे.

भारतामध्ये झाला होता जन्म

रॉबीन जॅकमेन यांचा जन्म 13 ऑगस्ट 1945 मध्ये सिमलामध्ये झाला होता. मात्र त्यानंतर ते लगेच इंग्लंडमध्ये गेले. जॅकमन यांनी 1966 मध्ये प्रथमश्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तब्बल 15 वर्ष वाट पाहावी लागली. 1981 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्यांची सर्वप्रथम इंग्लंडच्या टीममध्ये निवड झाली होती.

एक टेस्ट झाली होती रद्द

जॅकमन यांची छोटीशी आंतरराष्ट्रीय कारकीर्द त्यांच्यामुळे रद्द झालेल्या एका टेस्टसाठी कायम आठवणीत राहणार आहे. त्यांचे दक्षिण आफ्रिकेशी जवळचे संबंध होते. या संबंधावर आक्षेप घेत गयाना सरकारनं त्यांचा व्हिसा नाकारला होता. इंग्लंडच्या क्रिकेट टीमने या राजकीय दबावाला बळी न पडता गयानामध्ये (Guyana) जाण्याचा निर्णय घेतला. अखेर ती टेस्ट रद्द झाली.

Published by: News18 Desk
First published: December 26, 2020, 1:04 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या