भारतीय क्रिकेटपटूला 'गोरा' बनवून इंग्रजांना घ्यायचं होतं संघात

एक असा क्रिकेटपटू ज्याने 18 वर्षांच्या कारकिर्दीत 10 सामने खेळले तेसुद्धा फक्त एकाच देशाविरुद्ध.

News18 Lokmat | Updated On: Oct 12, 2019 02:18 PM IST

भारतीय क्रिकेटपटूला 'गोरा' बनवून इंग्रजांना घ्यायचं होतं संघात

मुंबई, 12 ऑक्टोबर : क्रिकेटमध्ये अनेक असे खेळाडू आहेत ज्यांचा जन्म एका देशात झाला असून दुसऱ्या देशाकडून क्रिकेट खेळले आहेत. मुंबईत 12 ऑक्टोबर 1911 ला मुंबईत एका सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या विजय मर्चंट यांना इंग्लंडच्या संघातून खेळवण्याची इच्छा त्यांच्या खेळाडूंची होती. विजय मर्चंट यांचं निधन 1987 मध्ये झालं. भारताकडून फक्त 10 कसोटी खेळलेल्या मर्चंट यांना भारताचे डॉन ब्रॅडमन म्हटलं जातं.

कॉलेजमध्ये असल्यापासूनच विजय मर्चंट यांनी स्पर्धांमधून धावांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही त्यांची कामगिरी चांगली राहिल्यानं भारतीय संघात वर्णी लागली. मात्र, देशभक्ती आणि गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झालेल्या विजय मर्चंट यांनी 1930-31 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या दौऱ्यातून माघार घेतली. त्यावेळी गांधीजींसह अनेक स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात टाकलं होतं.

चार वर्षांनी 1933-34 मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला तेव्हा विजय मर्चंट संघात होते. त्यावेळी स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेत्यांची तुरुंगातून सुटका झाली होती. वयाच्या 22 व्या वर्षी विजय मर्चंट यांनी भारताकडून पहिला सामना खेळला. त्यानंतर 1936 मध्ये इंग्लंडविरुद्ध मर्चंट यांनी मॅनचेस्टरवर शतक साजरं केलं होतं. तेव्हा इंग्लंडचा क्रिकेटपटू सीबी फ्रायने म्हटलं होतं की, चला विजय मर्चंटला रंग देऊया आणि ऑस्ट्रेलियाला घेऊन जाऊया. म्हणजे तो आपल्याकडून सलामीला खेळू शकेल.

विजय मर्चंट यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द 18 वर्षांची होती. मात्र, यातील 10 वर्ष दुसऱ्या महायुद्धामुळे वाया गेली. याचा परिणाम म्हणून मर्चंट यांना फक्त 10 कसोटी सामनेच खेळता आले. 1951 मध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे त्यांनी निवृत्ती घेतली.

विजय मर्चंट यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 10 कसोटी सामने खेळले. ते सर्व सामने इंग्लंडविरुद्धच होते. 1933 मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांनी इंग्लंडविरुद्ध कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी कारकिर्दीतील अखेरचा सामना 18 वर्षांनंतर 1951 मध्ये खेळला. त्यांनी यामध्ये एकूण 859 धावा केल्या. यात तीन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता. त्यांच्या या कामगिरीनंतरही भारताला 10 पैकी एकही सामना जिंकता आला नव्हता.

Loading...

रणजी क्रिकेटमध्ये त्यांनी 98.75 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर ही सर्वाधिक सरासरी आहे. विजय मर्चंट यांनी एकूण 150 प्रथम श्रेणीचे सामने खेळले. यापैकी त्यांच्या नावावर 71.64 च्या सरासरीने 13 हजार 470 धावांची नोंद आहे. यात 45 शतकं आणि 52 अर्धशतकं असून त्यांची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 359 ही आहे.

वाचा : 'पांड्या मी नेहमी तुझ्यासोबत', वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अभिनेत्री झाली भावूक

वाचा : क्रिकेट वाचवण्यासाठी अखेर ‘देव’ आला धावून, युवा खेळाडूंना दिला महत्त्वाचा सल्ला

SPECIAL REPORT: तळकोकणातील राजकीय शिमग्यात मुख्यमंत्र्यांची उडी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 02:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...