भारताच्या माजी क्रिकेटपटूचं सोशल मीडियावर बनावट खातं, पोलिसांत तक्रार दाखल

भारताच्या माजी क्रिकेटपटूचं सोशल मीडियावर बनावट खातं, पोलिसांत तक्रार दाखल

सोशल मीडियावर बनावट खातं तयार करून त्यावरून क्रिकेटपटू, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडे त्यांचे नंबर मागितल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 27 ऑगस्ट : भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचं फेक अकाउंट सोशल मीडियावर तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली आहे. संदीप पाटील यांच्या नावानं बनावट सोशल मीडिया अकाउंट तयार केल्यानंतर त्यावरून काही क्रिकेटपटूंकडे त्यांचे नंबर मागितले. हा प्रकार समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनं संदीप पाटील यांचे बनावट खात्याचबद्दलचं वृत्त दिलं आहे. भारतीय क्रिकेट संघ निवड समितीचे माजी अध्यक्ष असलेल्या संदीप पाटील यांच अकाउंट तयार करणाऱ्याचे नाव समजू शकले नाही. तसेच कोणत्या क्रिकेटपटूंचे नंबर मागितले याची माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, संदीप पाटील यांना एका मित्रानं फोन केल्यानंतर फेसबुक अकाऊंटबद्दल विचारलं. तेव्हा त्यांना याबाबत कोणतीच कल्पना नव्हती. एकापाठोपाठ दोघांनी फेसबुकबद्दल आणि फोन नंबर मागण्याबद्दल विचारताच संदीप पाटील यांना संशय आला. त्यानंतर पाटील यांनी शिवाजी पार्क इथल्या पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बनावट खातं ब्लॉक केलं आहे. पोलिसांनी खटला दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

VIDEO : धावत्या रिक्षातून विद्यार्थी फेकला गेला बाहेर, तोच उठून पळाला मागे

Published by: Suraj Yadav
First published: August 27, 2019, 2:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading