धक्कादायक! भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या सासऱ्याचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

धक्कादायक! भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या सासऱ्याचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

भारताला अनेक सामने जिंकून देणाऱ्या भारतीय गोलंदाजाच्या सासऱ्यांचा धक्कादायक मृत्यू.

  • Share this:

मेरठ, 18 ऑगस्ट : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार याचे सासरे अनिल कुमार यांचा तिसऱ्या मजल्यावरून पडून धक्कादायक मृत्यू झाला आहे. मेरठचे मुख्य अधिक्षक प्रमोद कुमार गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अनिल कुमार पुदीन्याची पाने तोडण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर गेले होते. दरम्यान पावसामुळं त्यांचा पाय घसरला आणि तिसऱ्या मजल्यावरून ते खाली पडले. दरम्यान त्यांचा जागीच मृत्यू झाला.

भारताचा जलद गोलंदाज प्रवीण कुमार याचे सासरे हे सेनानिवृत्त हवालदार होते. दरम्यान त्यांचा अपघात झाल्यानंतर लगेचच त्यांना केएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच प्रवीण कुमारही रुग्णालयात पोहचला. प्रवीण कुमारनं पत्रकारांशी बोलताना, “पावसामुळं पाणी साचल्यामुळं पाय घसरून हा अपघात झाला”, असे सांगितले.

2018मध्ये घेतली होती निवृत्ती

भारताचा मध्यमगती बॉलर प्रवीण कुमार यानं ट्विटरवरून 2018मध्ये आपण संन्यास घेत असल्याची घोषणा केली होती. 2012मध्ये पाकिस्तान विरोधात शेवटचा एकदिवसीय सामना त्यांनी खेळला. त्यानंतर मधल्या काळात प्रवीण कुमार नैराश्यात होता. या कठिण काळात रोहित शर्मानं त्याची खुप मदत केली. त्यानंतर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून तर 2017मध्ये गुजरात लायन्सकडून आयपीएल खेळला. मात्र त्यानंतर आयपीएलमध्ये त्याला संधी मिळाली नाही.

दुखापतींमुळे संपले करिअर

एकेकाळी भारताचा अव्वल जलद गोलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रवीण कुमार अचानक 2018मध्ये निवृत्ती जाहीर करावी लागली. मात्र, सततच्या दुखापतींमुळं तो संघात आपली जागा कायम ठेवू शकला नाही. दुखापतींमुळेच 2011 वर्ल्ड कपमध्ये प्रवीण कुमार सामिल होऊ शकला नव्हता.

तीन भारतीय ठरले पाकिस्तानला भारी, हा VIDEO पाहाच

Published by: Akshay Shitole
First published: August 18, 2019, 7:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading