क्रिकेटपटू आणि आलियामध्ये रंगले GIF वॉर, चर्चा मुंबईपासून केपटाऊनपर्यंत!

क्रिकेटपटू आणि आलियामध्ये रंगले GIF वॉर, चर्चा मुंबईपासून केपटाऊनपर्यंत!

हर्शल गिब्सनं सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिला ट्रोल केले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज सलामी फलंदाज हर्शल गिब्सनं सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिला ट्रोल केले आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट राझी, हायवे आणि उडता पंजाब यांसारख्या चित्रपटांमुळं ओळखली जाते. फक्त भारतातच नाही तर जगभरात आलियाचे चाहते आहेत. मात्र सध्या क्रिकेटपटू हर्शल गिब्सच्या एका ट्विटमुळं आलिया ट्रोल होत आहे.

दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज त्याच ट्विटर अकाऊंट अधिकृत झाल्याचा आनंद व्यक्त करत होता. यावेळी त्यानं एक GIF शेअर केला.

यात आलिया भट्ट नाचताना दिसत आहे, मात्र गिब्सला चाहत्यांनी विचारल्यानंतर ही मुलगी आहे कोण, असा प्रश्न विचारला होता. दरम्यान गिब्सच्या एक ट्वीटला एका चाहत्यांने लाईक करत, हे GIF शेअर केले. त्यानंतर यावरून आलिया आणि गिब्स दोघेही ट्रोल झाले.

दरम्यान, आलिया भट्टनं गिब्सला आपल्या अंदाजात उत्तर दिले. आलियानं एक GIF शेअर करत यावर इमोजीनं रिप्लाय दिला तर चौकाराचे चिन्ह असलेले GIF शेअर केले.

त्यानंतर गिब्सनं आणखी एक ट्वीट करत, मी चौकारांमध्ये नाही तर षटकारांमध्ये खेळतो, असे ट्वीट केले.

तसेच गिब्सनं मला माहित नव्हतं की आलिया अभिनेत्री आहे, पण मला GIF आवडलं आहे, असे ट्वीट केले. या सगळ्या GIF वॉरनंतर सोशल मीडियावर आलियाच्या चाहत्यांनी गिब्सला ट्रोल करण्यात सुरुवात केली. काही चाहत्यांनी तर, रणबीर कपूरला टॅग केले. तर काही चाहत्यांनी गिब्सला भारतीय चाहते नको आहे, असे म्हटले आहे. आलिया सध्या सडक-2, ब्रम्हास्त्र या सिनेमांमध्ये व्यस्त आहे.

VIDEO:11 हजार व्होल्ट तीव्र विजेच्या तारेला अडकलं चार्टर्ड विमान, त्यांनतर काय झालं तुम्हीच पाहा

First published: August 27, 2019, 5:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading