'चक दे'ची प्रेरणा असलेल्या खेळाडूला पतीकडूनच अमानुष मारहाण, फोटो पाहून अंगावर येईल काटा

'चक दे'ची प्रेरणा असलेल्या खेळाडूला पतीकडूनच अमानुष मारहाण, फोटो पाहून अंगावर येईल काटा

भारताच्या महिला हॉकी संघाची माजी कर्णधार आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या सुरज लता देवी यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : भारताच्या महिला हॉकी संघाची माजी कर्णधार आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या सुरज लता देवी यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार दिल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. लग्नापासून आतापर्यंत हुंड्यासाठी पतीने छळ केल्याचा आरोप त्यांनी केली.

सुरज लता देवी यांनी सांगितलं की, '2005 ला लग्न झाल्यापासून पतीने माझा छळ केला. यात हुंड्यासाठी सातत्याने छळ केला गेला. मी जेव्हा लग्नानंतर मला मिळालेली पदके आणि फोटो घेऊन आले तेव्हा पतीने मला याचा काय उपयोग असं म्हटलं. अर्जुन पुरस्कार मिळाला तेव्हा माझ्यावर अनैतिकतेचा आरोप पतीने केला.

मला ही गोष्ट लोकांसमोर आणायची नव्हती. पण एखादी गोष्ट सहन करण्याची मर्यादा असते आणि माझ्या सहनशिलतेचा अंत झाला असं सुरज लता देवी यांनी म्हटलं. सुरज लता यांना नोव्हेंबर 2019 मध्ये पतीने दारुच्या नशेत अमानुष मारहाण केली होती. त्यावेळी सुरज लता यांनी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्या रेल्वे कोच फॅक्ट्रीमार्फत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सामना अधिकारी म्हणून काम बघत होत्या. जानेवारीमध्ये पतीविरुद्ध त्यांनी तक्रार दाखल केली होती.

याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुल्तानपूर लोधी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. कलम 498 ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वाचा : क्रीडा जगतात खळबळ, भारताच्या 2 खेळाडूंची गोळी मारून हत्या

सुरज लता देवी यांच्या नेतृत्वाखाली भारताने 2002 ची राष्ट्रकुल स्पर्धा, 2003 मध्ये अॅफ्रो एशियन गेम्स, हॉकी एशिया गेम्स या तीन स्पर्धा जिंकल्या होत्या. राष्ट्रकुलमध्ये मिळवलेल्या विजेतेपदावर 2007 मध्ये चकदे इंडिया हा चित्रपटही काढण्यात आला होता.

वाचा : खेळाडूनं पत्नी आणि 3 मुलांना कारमध्ये बंद करून जिवंत जाळलं, नंतर केली आत्महत्या

First published: February 20, 2020, 6:50 PM IST

ताज्या बातम्या