नवी दिल्ली, 7 डिसेंबर: न्यूझीलंडचा माजी कर्णधार जेरेमी कोनी(Jeremy Coney) याने भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर आपल्या संघाला चांगल्या फिरकी गोलंदाजीसमोर कौशल्य विकसित करण्यासाठी पुरेसे धाडस दाखवावे लागेल, असे मत व्यक्त केले.
मुंबई (IND vs NZ) येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांना टीम इंडियाच्या स्पिनरीनी चांगलेच दमवले. भारतीय गोलंदाजांसमोर न्यूझीलंडला मोठी धावसंख्या गाठता आला नाही. मोठ्या फरकाने कसोटीमध्ये पराभव स्विकारावा लागला.
जेरेमी कोनीने स्पोर्ट न्यूज चॅनलशी संवाद साधला. तो म्हणाला, 'मला वाटते न्यूझीलंड क्रिकेटला धैर्य दाखवण्याची गरज आहे. त्यांनी फिरकी गोलंदाजीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि खेळाचा तो भाग विकसित करण्यासाठी वेळ आणि पैसा द्यावा लागेल. तसेच खेळाडूंना भारतात पाठवण्याचा प्रयत्न करायला हवा. असे मत कोनीने यावेळी व्यक्त केले.
भारतात जन्मलेला न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाझ पटेलने या सामन्याच्या पहिल्या डावात सर्व 10 बळी घेत आश्चर्यकारक कामगिरी केली. हा विक्रम करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे. दुसऱ्या डावातही त्याने 4 बळी घेतले. न्यूझीलंडसाठी 52 कसोटी सामन्यांमध्ये 2668 धावा करणाऱ्या कोनी म्हणाला, 'न्यूझीलंडमध्ये विकेट तयार करणे हा दुसरा पर्याय आहे जिथे चेंडू इतरांपेक्षा जास्त फिरतो. यामुळे फलंदाजांना तसेच यष्टिरक्षक आणि क्षेत्ररक्षकांना या खेळपट्ट्या समजून घेण्याची संधी मिळेल.
हे सर्व पूर्णवेळ क्रिकेट आहे आणि मला वाटते की आम्हाला यावर अधिक काम करण्याची गरज आहे.' धावांच्या बाबतीत न्यूझीलंडचा हा सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी 2007 मध्ये जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेने त्याचा 358 धावांनी पराभव केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: New zealand, R ashwin