• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 World Cup आधी ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये मोठा बदल, माजी कॅप्टनला नवी जबाबदारी

T20 World Cup आधी ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये मोठा बदल, माजी कॅप्टनला नवी जबाबदारी

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएई आणि ओमानमध्ये टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) होणार आहे. त्याआधी क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये (Cricket Australia) मोठा बदल झाला आहे.

 • Share this:
  मुंबई, 1 ऑगस्ट : यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएई आणि ओमानमध्ये टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) होणार आहे. त्याआधी क्रिकेट ऑस्ट्रेलियामध्ये (Cricket Australia) मोठा बदल झाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवड समिती अध्यक्ष बदलला आहे. आता ट्रेव्हर होन्स (Trevor Hohns) यांच्या ऐवजी जॉर्ज बेली (George Bailey) याला निवड समिती अध्यक्ष करण्यात आलं आहे. जॉर्ज बेली टी-20 वर्ल्ड कप आणि ऍशेस सीरिजसाठी (Ashes Series) टीमची निवड करेल. बेलीने ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 125 मॅच खेळल्या. दोन वर्षांपूर्वी तो निवड समितीचा भाग बनला होता. आता त्याचं निवड समिती अध्यक्ष म्हणून प्रमोशन झालं आहे. ट्रेव्हर होन्स 21 वर्ष क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीमध्ये होते, यादरम्यान ते 16 वर्ष निवड समिती अध्यक्ष होते. पहिल्यांदा 1991 ते 2005 पर्यंत त्यांनी ही जबाबदारी पार पाडली, यानंतर 2016 पासून ते या पदावर होते. ट्रेव्हर यांनी केलेल्या अविश्वसनीय कामाबाबत मी त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो, असं जॉर्ज बेली म्हणाला आहे. 'ते निवड समितीमध्ये असताना ऑस्ट्रेलियन टीम खूप काळ यशस्वी राहिली. मीही एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून या प्रवासाचा भाग होतो. हे आव्हानात्मक काम करताना ते नेहमीच शांत असायचे. त्यांनी माझा एक खेळाडू ते सिलेक्टर हा प्रवासही सोपा केला. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. ही जबाबदारी पार पाडायला मी तयार आहे,' अशी प्रतिक्रिया बेलीने दिली. कोण आहेत ट्रेव्हर होन्स? होन्स 1989 ऍशेस सीरिज जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या टीमचा भाग होते. होन्स निवड समिती अध्यक्ष असताना आपल्या पहिल्या कार्यकाळात ऑस्ट्रेलियाने लागोपाठ 5 ऍशेस जिंकल्या. याशिवाय 1999 आणि 2003 अशा लागोपाठ दोन वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला. बेलीवर नवी जबाबदारी आता जॉर्ज बेली याच्यावर टी-20 वर्ल्ड कप आणि ऍशेस सीरिजसाठी टीमची निवड करणं, ही मोठी जबाबदारी बेलीवर असणार आहे. बेली ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये 125 मॅच खेळला, यामध्ये त्याने 3,700 रन केले, यात 3 शतकांचाही समावेश आहे. बेलीने 57 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं, यात त्याचा 30 मॅचमध्ये विजय झाला.
  Published by:Shreyas
  First published: