‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप

‘क्रिकेट बोर्डच करते आंतरराष्ट्रीय सामने फिक्स’, माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप

क्रिकेट विश्वाला हादरून सोडणारी घटना, क्रिकेट बोर्डावर झाले आंतरराष्ट्रीय सामने फिक्स केल्याचे आरोप

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : एकीकडे पगारवाढीवरून खेळाडू संपावर गेले असताना आता चक्क क्रिकेट बोर्डावर सामने फिक्स केल्याचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे, याआधी 50 खेळाडूंनी क्रिकेटवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. याता बोर्डाच्या माजी अध्यक्षांनी चक्क क्रिकेट बोर्डवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

बीसीबीचे माजी अध्यक्ष साबीर हुसैन चौधरी यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डमध्ये मोठे भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी, “बांगलादेश क्रिकेट बोर्ड जगातली एक मात्र अशी संस्था आहे जी, स्वत: सामने फिक्स करतात”, असा धक्कादायक खुलासा केला. एवढेच नाही तर, “मी अनेकवेळा याबाबत आवाज उठवला आहे”, असेही त्य़ांनी सांगितले.

बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब-अल-हसननं सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत घरेलु क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे सांगितले होते. यावर चिंता व्यक्त करतात त्यानं खेळाडूंच्या पगारातही वाढ झाली पाहिजे, यासाठी खेळाडू संपावर असल्याचे जाहीर केले. यामुळं भारत-बांगलादेश यांच्यात 2 नोव्हेंबरपासून होणारी मालिका आता धोक्यात आली आहे. याशिवाय घरेलु क्रिकेटमध्येही पगारात 50 टक्के वाढ करून मॅच फीमध्ये कमी कपात करण्याची मागणी केली आहे.

वाचा-पगारवाढीसाठी कर्णधारासह संपूर्ण संघ संपावर, टी-20 वर्ल्ड कप धोक्यात

वाचा-‘धोनी, सचिन आणि सनी लिओनी…’ यांची नावे सर्च करण्याआधी राहा सावधान!

सर्व खेळाडूंनी सामने खेळण्यास दिला नकार

सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व महत्त्वाच्या खेळाडूंनी घेतला आहे. यात कसोटी आणि टी-20 संघाचा कर्णधार शाकिब-अल-हसन, विकेटकीपर मुशफिकुर रहीम आणि महमदुल्लाह यांच्यासारख्या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. सोमवारी एक पत्रकार परिषद घेत खेळाडूंनी देशातील 50 खेळाडूंनी क्रिकेट बोर्डासमोर आपल्या मागण्या मांडल्या. दरम्यान मागण्या पूर्ण न झाल्यास क्रिकेटवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय खेळाडूंनी घेतला आहे.

वाचा-हा तर कॅच नव्हताच! पाहा आफ्रिकेविरुद्ध साहाचा अफलातून VIDEO

बांगलादेश प्रिमीअर लीगमध्ये झाला भ्रष्टाचार

बांगलादेश क्रिकेट बोर्डावर झालेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपावरून 2014मध्ये बांगलादेश प्रिमीअर लीग ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. यानंतर 2017मध्ये पुन्हा हा प्रकार समोर आला. जेव्हा एका सामन्यात सलग वाईड आणि नो-बॉल टाकण्यात आले. या सामन्यातील एका ओव्हरमध्ये चक्क 92 धावा देण्यात आल्या होत्या. त्यामुळं या सामन्यामुळं मॅच फिक्सिंग होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2019 06:04 PM IST

ताज्या बातम्या