मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

आधी भारतीय महिलेशी लग्न, आता रणजी कोच झाला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

आधी भारतीय महिलेशी लग्न, आता रणजी कोच झाला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर शॉन टेट (Shaun Tait) याची पुदुच्चेरी क्रिकेट टीमच्या (Puducherry Cricket Team) बॉलिंग प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ पाँडेचेरीच्या (CAP) सूत्रांनी याबाबत माहिती दिली.

ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर शॉन टेट (Shaun Tait) याची पुदुच्चेरी क्रिकेट टीमच्या (Puducherry Cricket Team) बॉलिंग प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ पाँडेचेरीच्या (CAP) सूत्रांनी याबाबत माहिती दिली.

ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर शॉन टेट (Shaun Tait) याची पुदुच्चेरी क्रिकेट टीमच्या (Puducherry Cricket Team) बॉलिंग प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ पाँडेचेरीच्या (CAP) सूत्रांनी याबाबत माहिती दिली.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 4 सप्टेंबर : ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर शॉन टेट (Shaun Tait) याची पुदुच्चेरी क्रिकेट टीमच्या (Puducherry Cricket Team) बॉलिंग प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ पाँडेचेरीच्या (CAP) सूत्रांनी याबाबत माहिती दिली. पुदुच्चेरीच्या टीममध्ये टेट हेड कोच दिशांत याग्निक (Dishant Yagnik) आणि स्ट्रेन्थ ऍण्ड कन्डिशनिंग कोच कल्पेंद्र झा यांच्यासोबत काम करेल. टेटची काहीच दिवसांपूर्वी अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा (Afghanistan Cricket Team) बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. टेट टीममध्ये सामील व्हायच्या आधीच अफगाणिस्तानमधली परिस्थिती बदलली आणि तिकडे तालीबानने (Taliban) ताबा मिळवला. तेव्हापासून टेट अफगाणिस्तान टीमला कोचिंग करेल का नाही, याबाबत संशय निर्माण झाला होता.

क्रिकेट असोसिएशन ऑफ पाँडेचेरीच्या सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला टेटच्या नियुक्तीबाबतची माहिती दिली. या महिन्याच्या अखेरीस टेट टीममध्ये दाखल होईल. पण जर त्याला अफगाणिस्तानच्या टीममधून बोलावणं आलं, तर तो आपला तिथला 5 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण करेल आणि मग पुदुच्चेरीच्या टीमशी जोडला जाईल, अशी प्रतिक्रिया क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी दिली.

शॉन टेट सीएपीच्या पुदुच्चेरीच्या अॅकेडमीमध्ये फास्ट बॉलरना ट्रेनिंग देईल. ऑस्ट्रेलियाकडून 3 टेस्ट, 35 वनडे आणि 21 टी-20 खेळणारा टेट आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळायचा. ऑस्ट्रेलियाला 2007 साली वर्ल्ड कप जिंकवण्यात टेटने महत्त्वाची भूमिका बजावली. तेव्हा त्याने 23 विकेट घेतल्या होत्या.

टेट ऑस्ट्रेलियाकडून 21 टी-20 खेळला. एका टी-20 मध्ये सर्वाधिक मेडन टाकण्याचा विक्रम टेटच्या नावावर आहे, त्याने 2010 साली बांगलादेशविरुद्धच्या टी-20 मध्ये 4 पैकी 2 ओव्हर मेडन टाकल्या होत्या आणि 15 रन देऊन 1 विकेट घेतली होती.

कोपराला झालेल्या दुखापतीमुळे टेटने 2017 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर तो कोचिंगकडे वळला. टेट क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा लेव्हल-टू प्रमाणित कोच आहे. बिग बॅश लीगमध्ये (BBL) टेटने मेलबर्न रेनेगेड्सचा बॉलिंग कोच म्हणून काम केलं आहे.

भारतीय मॉडेलशी केलं लग्न

शॉन टेटने भारतीय मॉडेल मासूम सिंघासोबत लग्न केलं आहे. काही वर्ष रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी 2014 साली लग्न केलं. टेटच्या लग्नात युवराज सिंगसह अनेक भारतीय क्रिकेटपटू सहभागी झाले होते. यानंतर 3 वर्षांनी टेटला भारतीय नागरिकत्व मिळालं. भारत सरकारने टेटला ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया म्हणजेच प्रवासी भारतीयाचा दर्जा दिला. तो बराच काळ भारतामध्ये घालवतो.

दिशांत याग्निक सध्या राजस्थान रॉयल्सचा फिल्डिंग कोचही आहे. या मोसमात डी रोहित पुदुच्चेरीचं नेतृत्व करेल. पुदुच्चेरीची टीम या मोसमात रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफी एलीट ग्रुपमधून खेळेल. सीएपीने एका कॅम्पमध्येच 8 मैदानं बनवली आहेत, यात इनडोअर सरावाची सुविधाही आहे.

First published:

Tags: Australia, Cricket