शेन वॉर्न म्हणतो, 'या दोन खेळाडूंनी खूप त्रास दिला'

शेन वॉर्न म्हणतो, 'या दोन खेळाडूंनी खूप त्रास दिला'

ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्न हा शतकातील सर्वात मोठ्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्न हा शतकातील सर्वात मोठ्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याला आतापर्यंत सर्वात यशस्वी स्पिनरपैकी एक म्हणून ओळखले जाते. शेन वॉर्नने 1992 ते 2007 पर्यंत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच त्याने टेस्ट आणि ODI मध्ये 1000 पेक्षा जास्त गडी बाद केले आहेत. 51 वर्षीय शेनने अलीकडेच त्याच्या काळातील दोन महान फलंदाजांची निवड केली आहे. हे दोन फलंदाज त्या काळात सर्वोत्कृष्ट होते आणि सदैव राहतील असे तो म्हणतो. लेग स्पिनर शेनने भारतीय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा यांची निवड केली आहे. त्यांच्याविरुद्ध खेळताना त्यांच्यावर वर्चस्व निर्माण करू शकलो नाही याची कबुली त्यांने दिली आहे.

"माझ्या क्रिकेटच्या काळात सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा हे दोन सर्वोत्कृष्ट फलंदाज होते, माझ्या क्रिकेटच्या काळात मी आतापर्यंत ज्यांच्यासोबत खेळलो त्यापैकी हे दोन सर्वात महान फलंदाज आहेत." असे वॉर्न स्पोर्टसकीडा  वेबसाइटला सांगितलं. वॉर्न म्हणाला, मला त्यांच्या सोबत खेळताना गोलंदाजी करायला आवडायचं. कधी त्या दोघांनी संपूर्ण मैदानात माझ्या बॉलवर चौकार-षटकार मारले. तर कधी मी त्यांना आउट केलंय.

हे ही वाचा-IPL 2020 : ...म्हणून रोहित शर्माशिवाय मुंबईची टीम मैदानात उतरली

ऑस्ट्रेलियाच्या या उत्तम खेळाडूने बोलताना असे सांगितले की त्याला सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लाराची फलंदाजी फार आवडते. त्या काळात या दोन फलंदाजांसह शेन वॉर्नला धरून 'बिग 3' हे विशेषण वापरलं जायचं हेही आवर्जून सांगितलं. तो स्वतःला खूपच भाग्यवान समजतो की त्याला या दोघांसोबत खेळायला मिळाले व मैदानावर एकत्र येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची संधी मिळाली.  शेन वॉर्नने 1992 ते 2007 पर्यंत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले होते. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन आणि भारताचा अनिल कुंबळे याच्या सारखे नावाजलेल्या फिरकीपटूंच्या काळात खेळताना वॉर्नने स्वत: ची ओळख निर्माण केली. 15 वर्षांच्या कारकिर्दीत वॉर्नने 708 टेस्ट आणि 293 ODI विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये वॉर्न दुसऱ्या स्थानावर आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: October 23, 2020, 9:28 PM IST
Tags: australia

ताज्या बातम्या