Home /News /sport /

T20World Cupआधी टीम इंडियाची नवी जर्सी लॉंच

T20World Cupआधी टीम इंडियाची नवी जर्सी लॉंच

T20World Cup पूर्वी टीम इंडियाची नवी जर्सी लॉंच

T20World Cup पूर्वी टीम इंडियाची नवी जर्सी लॉंच

टी20 वर्ल्डकपची(T20World Cup ) सुरुवात 17 ऑक्टोबरला आणि अंतिम सामना 14 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. तत्पूर्वी, बीसीसीआयने (BCCI)टीम इंडियाची नवी जर्सी लॉंच (Team India New Jersey)केली आहे.

  नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर: टी20 वर्ल्डकपची(T20World Cup ) सुरुवात 17 ऑक्टोबरला आणि अंतिम सामना 14 नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. तत्पूर्वी, बीसीसीआयने (BCCI)टीम इंडियाची नवी जर्सी लॉंच (Team India New Jersey)केली आहे. पण जर्सी टी20 वर्ल्डकपसाठी आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. नुकतेच संघातील खेळाडूंनी ही जर्सी घातलेले फोटोही बीसीसीआयने पोस्ट केले आहेत. ही जर्सी एमपीएल स्पोर्ट्सने लॉन्च केली असून तेच यंदा भारतीय संघाचे अधिकृत किट स्पॉन्सर आहेत. बीसीसीआयने याबद्दलची माहिती देताना लिहिलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “या जर्सीचे रंग हे करोडो भारतीय फॅन्स जे संघाला चिअर करतात. त्यांना पाहून तयार करण्यात आली आहे.” या जर्सीला ‘बिलियन चियर्स जर्सी’ असंच नावही दिलं आहे. सध्या भारतीय संघ घालत असलेल्या गडद निळ्या रंगासारखीच या जर्सीचा रंगही गडद आहे. पूर्वी भारत आकाशी कलरच्याच जर्सीस घालत पण अलीकडे गडद रंगाच्या जर्सी घालू लागला आहे.

  पण जर्सी टी20 वर्ल्डकपसाठी आहे का?

  टीम इंडियाची नवी जर्सी लॉंच होताच क्रिकेट वर्तुळात ही जर्सी टी20 वर्ल्डकपसाठी आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण, आयसीसीच्या नियमांप्रमाणे विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांना जर्सीच्या उजव्या बाजूला स्पर्धेचे नाव आणि आयोजकांचे नाव त्यांच्या जर्सीवर लिहावे लागते. पण, टीम इंडियाच्या लॉंच करण्यात आलेल्या या जर्सीवर एमपीएल चा लोगो दिसत आहे. तसेच बीसीसीआयने टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाच्या जर्सीबद्दल अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.

  टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

  भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: T20 cricket, T20 world cup

  पुढील बातम्या