S M L

FIFA WORLD CUP 2018 : उरुग्वेचा इजिप्तवर रोमहर्षक विजय

Sachin Salve | Updated On: Jun 15, 2018 09:22 PM IST

FIFA WORLD CUP 2018 : उरुग्वेचा इजिप्तवर रोमहर्षक विजय

15 जून :  फीफा वर्ल्डकपच्या 21 व्या हंगामात जोस गिमेनेजने 90 व्या मिनिटात गोल करून उरुग्वेनं इजिप्तवर थरारक विजय मिळवला.

एकातेरीनाबर्ग स्टेडियममध्ये शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या स्पर्धेच्या ‘अ’ गटातील रोमहर्षक सामन्यात उरुग्वेनं इजिप्तला 1-0 ने पराभव केला. या सामन्यासह इजिप्तचा स्टार खेळाडून मोहम्मद सलाहची गरज प्रामुख्याने जाणवली. कारण उरुग्वेचा कडवी टक्कर देण्यास टीम अपयशी ठरली.

उरुग्वेने आक्रमक खेळी केली पण 23 व्या मिनिटात गोल करण्याची संधी हुकवली. काॅर्नरची संधी हाती आली असतानाही गोल करू शकली नाही. पण अखेरच्या 90 व्या मिनिटात जोस गिमेनेजने धडाकेबाज गोल केला आणि विजय मिळवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2018 09:22 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close