मुंबई, 8 ऑगस्ट : फुटबॉल सुपरस्टार लियोनेल मेस्सीनं (Lionel Messi) आणि स्पेनच्या बार्सिलोना फुटबॉल क्लबला अखेरचा निरोप दिला आहे. मेस्सीचा बार्सिलोनासोबतचा करार 30 जून रोजी संपला होता. त्यानंतर हा करार वाढवण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये बोलणी सुरु होती. ती बोलणी यशस्वी न झाल्यानं अखेर मेस्सीनं बार्सिलोनाला निरोप दिला आहे. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मेस्सी चांगलाच भावुक झाला होता. त्याला अश्रू देखील अनावर झाले.
'मी आणि माझ्या कुटुंबीयांना आम्ही इथेच राहू अशी आशा होती. ही एकच गोष्ट आम्हाला इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त हवी होती. मी आज 21 वर्षानंतर माझ्या पत्नी आणि तीन मुलांसह या क्लबला अखेरचा निरोप देत आहे. मला आज काय बोलावं हेच समजत नाही, असे सांगताना अश्रू अनावर झाले होते. यावेळी मेस्सीला सर्वांनी उभं राहून मानवंदना दिली.
का संपले नाते?
मेस्सी बार्सिलोनासबोत पुन्हा एकदा नव्या अटींसह करार करेल असा फुटबॉल फॅन्सचा अंदाज होता. दोन्ही पक्षांमध्ये चर्चा आणि सहमतीचे प्रयत्न काही दिवसांपूर्वीपर्यंत सुरु होते. अखेर गुरुवारी रात्री बार्सिलोनानं क्लबनं पत्रक काढत हे नातं संपल्याची अधिकृत घोषणा केली.
'एफसी बार्सिलोना आणि मेस्सी या दोन्ही पक्षांनी करार करण्याचा प्रयत्न केला. मात्र स्पॅनिश लीगमधील नियम आणि आर्थिक गोष्टींमुळे हे शक्य झाले नाही. त्यामुळे मेस्सी आता बार्सिलोना क्लबसोबत नसेल. क्लब आणि खेळाडू दोघांचीही इच्छा पूर्ण झाली नाही याचा आम्हाला खेद आहे.' मेस्सीच्या योगदानाबद्दल बार्सिलोनानं आभार मानले असून त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Lionel Messi receives a standing ovation from his team-mates and family as he bids farewell to Barcelona.
Hopefully the Blaugranas fans will be able to wish him a real goodbye soon. pic.twitter.com/njuVYCE6kI — Football on BT Sport (@btsportfootball) August 8, 2021
फुटबॉल विश्वातील बलाढ्य क्लब असलेल्या बार्सिलोनावर सध्या कर्जाचा डोंगर आहे. या क्लबवर सध्या जवळपास 8 हजार कोटींचे कर्ज आहे. कर्जचाच्या ओझ्याखाली दबलेल्या या क्लबला मेस्सी सारखा महागडा खेळाडू परडवणार नव्हता. मेस्सीनं 2017 साली केलेल्या करारानुसार त्याला 5 वर्षांमध्ये 550 मिलियन युरो मिळाले होते.
Tokyo Olympics : नीरज चोप्राच्या गोल्डनं खेळाडूंमध्ये जोश, गावसकरांसोबत सर्वांनी गायल गाणं VIDEO
मेस्सीनं नवा करार करण्यासाठी त्याच्या मानधनात 50 टक्के कपात करण्याची तयारी दाखवली होती. तरही त्याचे मानधन इतर खेळाडूंपेक्षा कितीतरी जास्त होते. त्यामुळेच या दोघांमधील करार पुढे जाऊ शकला नाही. आता मेस्सी फ्रान्समधील बलाढ्य फुटबॉल क्लब पीएसजी (PSG) सोबत करार करण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Football